मुंबई Case against Bhavesh Bhinde : घाटकोपर होर्डिंग कोसळल्या प्रकरणी होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर पंतनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान 304, 338, 337 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या अगोदर देखील पोलीस आणि बीएमसीकडून भिंडे याच्यावर अनेक गुन्हे आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी 2023 मध्ये सुद्धा आरोपी भावेश भिंडे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती मिळत आहे.
जानेवारी 2024 मध्ये भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा एक गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलिसांनी भावेश भिंडे विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्याच्याविरुद्ध बृहन्मुंबई महानगर पालिकेनं अनेक एफआयआर नोंदवले आहेत. तसंच भावेश भिंडे याने 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळी भावेश भिंडेनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यानं सांगितले होतं की, 2009 मध्ये त्याच्यावर 23 गुन्हे दाखल होते. ही सर्व प्रकरणं चेक बाऊन्ससाठी मुंबई महानगरपालिका कायदा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत आहेत.
मागील दशकात होर्डिंग्ज आणि बॅनर्ससाठी अनेक रेल्वे आणि बीएमसी कॉन्ट्रॅक्ट्स भिंडे यानं मिळवली होती. तसंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महानगरपालिका आणि रेल्वेच्या अनेक नियमांचं उल्लंघन केलं होतं. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर वृक्षतोडीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
13 मे रोजी घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यानं 14 लोकांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक भावेश भिंडे याच्यासह अन्य तिघांवर कलम 304 अन्वये पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी भिंडे गुजू ॲड्स नावाची कंपनी चालवत होता आणि त्याच्यावर आणि कंपनीवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला महापालिकेनं काळ्या यादीत टाकलं होतं. तरीही त्याने Ego Media प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी सुरू केली आणि त्याला होर्डिंगची कंत्राटं मिळू लागली.
हेही वाचा
- पेट्रोल पंप असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा, आणखी काहीजण होर्डिंगखाली अडकल्याची भीती - Ghatkopar Hording Collapsed
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : उद्योगपती आनंद महिंद्रांनी व्यक्त केलं दु:ख, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी . . . - Ghatkopar Hoarding Collapse
- घाटकोपर दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू; घटनेची चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Mumbai Rain