ठाणे APMC Toilet Fraud Case : वाशी येथील एपीएमसीच्या विकासाच्या टप्प्यात आरोपींनी 466 व्यक्तींना गाळे (दुकाने) वितरित केले. त्यांच्याकडून 2 हजार रुपये प्रति चौरस फूट (लागू दर) ऐवजी 600 रुपये प्रति चौरस फूट कमी दर आकारला. त्यामुळे त्यांनी एपीएमसीचा 62,07,48,324 रुपयांचा महसूल बुडवला, असे एका अधिकाऱ्यानं सांगितलं. आरोपींनी रेडी रेकनरपेक्षा कमी दराने एफएसआय वितरित केला आणि गाळे मालकांना वाढीव दराने एफएसआय वाटपाची पत्रे दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
एफआयआरमध्ये या नेत्यांचा समावेश : एका लेखा परीक्षकाच्या तक्रारीच्या आधारे, शनिवारी भारतीय दंड संहिता कलम 406, 409 (गुन्हेगारी विश्वासभंग), 420 (फसवणूक) आणि 34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) अंतर्गत 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार शशिकांत शिंदे आणि एपीएमसीचे माजी संचालक संजय पानसरे यांचा समावेश आहे.
आठ जणांवर गुन्हा दाखल : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणी माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर एकूण आठ जणांवर 12 नोव्हेंबर, 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्यामुळे 7 कोटी 61 लाख 49 हजार 689 रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा आहे. नवी मुंबई पोलिसांकडून एपीएमसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये यांचा समावेश : माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सात आजी माजी 'एपीएमसी' अधिकाऱ्यांवर शौचालय घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालायं. यामध्ये रवींद्र आनंदराव पाटील (सेवानिवृत्त तत्कालीन उपसचिव), सिताराम कावरखे (सेवानिवृत तत्कालीन उपसचिव), जी. एम. वाकडे (सेवानिवृत्त तत्कालीन उपसचिव), विजय पद्माकर शिंगाडे (उपसचिव एपीएमसी), सुदर्शन पांडुरंग भोजनकर (उपअभियंता, एपीएमसी), राजेंद्र झुंजारराव (कनिष्ठ अभियंता, एपीएमसी), विलास पांडुरंग पवार (कार्यालयीन अधीक्षक, बाजार समिती) यांचा समावेश आहे. या आठ जणांनी मिळून वेळोवेळी कायद्यानं ठरवून दिलेली प्रक्रिया डावलून 'एपीएमसी'साठी नुकसानदायक निर्णय घेतले.
हेही वाचा :
- लंडन महापौरपदाची शर्यत : सादिक खान यांना भारतीय वंशाच्या बँकरचं जोरदार आव्हान, जाणून घ्या तरुण गुलाटी यांच्याबद्दल - London Mayoral Poll
- बाप्पा यांना पाव रे! अरविंद सावंत, अनिल देसाईंसह राहुल शेवाळे अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी - Lok Sabha Election
- पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र! आज आणि उद्या राज्यात घेणार सहा सभा, भर उन्हात तापणार राजकारण - LOK SABHA ELECTION 2024