नागपूर Lok Sabha Election Campaign : पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघाचा समावेश आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सर्व पक्षाच्या उमेदवारांनी जीवाचं रान करत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाची बाजी लागली होती. आज प्रचार जरी संपला असला तरी उद्या मात्र गुप्त बैठकीच्या माध्यमातून गुप्त प्रचार केला जाईल. आता १९ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
19 एप्रिल रोजी मतदान : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात विदर्भातील पाच मतदारसंघ समाविष्ट आहेत. त्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.
रामाचा रथ ओढल्यानंतर प्रचाराची सांगता : मध्य भारतातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून श्रीरामाची भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी नागपूर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपा उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या हस्ते रामाचा रथ ओढून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि शहरातील आमदार उपस्थित होते. प्रभू श्रीरामाचा रथ ओढल्यानंतर प्रचार तोफा थंडावल्या आहेत.
अंतिम क्षणापर्यंत प्रचार व आरोपांच्या फैरी : नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल्या प्रत्येक उमेदवारांनी अंतिम क्षणापर्यंत प्रचार केला आहे. ज्यास्तीत जास्त मतदारांपर्यत पोहचून आपला प्रचार करण्याचा प्रयत्न हा उमेदवारांनी केला तर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. नितीन गडकरी यांनी काल संकल्पपत्र जाहीर केलेलं आहे ते संकल्प पत्र नसून जुमला पत्र आहे असा आरोप विकास ठाकरे यांनी केलाय.
हेही वाचा :
- लोकसभा निकालानंतर भाजपावर आकडे लावण्याची वेळ येईल, इंडिया आघाडी 300 पेक्षा जास्त जागा जिकंणार - संजय राऊत - LOK SABHA ELECTION 2024
- लोकसभा निवडणूक 2024: पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; वाचा देशभरातील प्रमुख मतदारसंघ, उमेदवारांची महत्वपूर्ण माहिती - Lok Sabha Election 2024
- काय आहे नागपूर मतदार संघाचं गणित?, कोणाच्या गळ्यात पडणार विजयी माळ - Lok Sabha Election 2024