ETV Bharat / state

बंदूक साफ करताना सुटली गोळी; दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी जखमी - RAIGAD NEWS

पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटली. यात त्या जखमी झाल्या आहेत.

Dadar Sagari Police Station
दादर सागरी पोलीस स्टेशन (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2024, 10:30 PM IST

रायगड (पेण) : पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये बंदुकीची गोळी लागून महिला पोलीस कार्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. नुतन लाड असं जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. सदर महिला पोलीस कर्मचारी बंदूक साफ करण्याचं काम करत असताना हा अपघात घडला.

कशी घडली घटना? : सविस्तर घटना अशी की, दादर सागरी पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशनमध्येच बंदूक साफ (सर्व्हिसिंग) करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली. ही गोळी ही नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्यानं त्या जखमी झाल्या. त्यांना लगेच पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तत्काळ पोलीस स्टेशनला भेट दिली.

नागपुरात घडली होती अशीच घटना : याआधीही नागपुरात अशीच एक घटना घडली होती. लॉक झालेली बंदूक अनलॉक करताना अचानक बंदुकीतून गोळी सुटल्यानं एक पोलीस शिपाई जखमी झाल्याची घटना नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यासमोरच घडली होती. शेषकुमार इंगळे असं जखमी पोलीस शिपायचं नाव होतं.

गोळी घुसली डाव्या पायाच्या मांडीत : शेषकुमार इंगळे यांची बदली बेलतरोडी पोलीस ठाण्यात झाली होती. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत चहा पिण्यासाठी पोलीस ठाण्यासमोरच्या ठेल्यावर गेले होते. त्यादरम्यान बंदूक लॉक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ती अनलॉक करण्याचा प्रयत्न केला असता अचानक बंदुकीतून गोळी सुटली. ती गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीत शिरली होती. फायरच्या आवाजाने पोलीस ठाण्याचा परिसर हादरून गेला होता. समोरच पोलीस ठाणे असल्यानं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी शेषकुमार इंगळे यांच्याकडं धाव घेतली होती. सहकाऱ्यांनी लगेच त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

हेही वाचा -

  1. जॉर्जियातील शाळेत विद्यार्थ्याच्या हातात पेनऐवजी बंदूक, अंदाधुंद गोळीबारात चार जण ठार - US GUN VIOLENCE
  2. धक्कादायक, एनएसजी कमांडोच्या स्पेशल MP 5 बंदुकीतून युवकाने केली जोरदार फायरिंग, व्हिडीओ व्हायरल youth fired with MP 5 gun
  3. Made weapons by watching YouTube : युट्युब पाहून बनवल्या बंदुका, इतर धोकादायक हत्यारे.. पोलिसांनी केली दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.