ETV Bharat / state

आईसाठी काहीपण!; ब्रिटिश-भारतीय तरुणानं केला लंडन ते ठाणे कारनं प्रवास - London To Thane Travel

London To Thane Travel : आई आणि मुलाचं नातं अतूट असतं. अनेक मुले कामानिमित्त घराबाहेर राहतात. त्यामुळं त्यांंना सतत घरी जाणं शक्य होत नाही. मात्र, एका ब्रिटिश-भारतीय व्यक्तीनं आईसाठी तब्बल 18, 300 किमीचा प्रवास केलाय. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विराजित मुंगळे (Virajit Mungale) यांनी आपल्या आईला भेटण्यासाठी लंडन ते ठाणे असा प्रवास त्यांच्या एसयूव्ही कारमधून पूर्ण केला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 9:49 PM IST

Traveled from London to Thane by car
लंडन ते ठाणे कारने केला प्रवास (ETV BHARAT Reporter)

ठाणे London To Thane Travel : जिद्द आणि आवड असली की, कोणतीही गोष्ट अवघड नसते अशीच एक कहाणी ठाण्यात पाहायला मिळाली. लंडनहून भारतात येण्यासाठी लोक सहसा विमानाचा वापर करतात. मात्र भारतीय वंशाच्या एका ब्रिटिश नागरिकांनी हा प्रवास रस्त्यानं पूर्ण करून इतिहास रचला आहे.

प्रतिक्रिया देताना विराजित मुंगळे (ETV BHARAT Reporter)

प्रवासाला लागले 59 दिवस : 16 देश पार करत विराजित मुंगळे आईला भेटण्यासाठी ठाण्यात पोहचला आहे. ब्रिटनची राजधानी लंडन सातासमुद्रापलीकडं आहे. मात्र, एका ब्रिटिश नागरिकाने 18 हजार 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून इतिहास रचला आहे. हा तरुण लंडनहून 16 देशांमार्गे भारतात पोहोचला. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एकूण 59 दिवस लागले. लंडनमध्ये राहणारे विराजित मुंगळे हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. भारतीय वंशाच्या विराजितची आई महाराष्ट्रातील ठाणे येथे राहते आणि तो आपल्या आईला भेटण्यासाठी थेट आपली कार चालवत ठाण्यात आला.

आईला भेटण्यासाठी केला प्रवास : विराजितने 20 एप्रिल रोजी लंडनहून प्रवास सुरू केला. 59 दिवसांनंतर ते 17 जून रोजी महाराष्ट्रातील ठाणे येथे पोहोचले. खरंतर विराजित हे अनेकदा आईला भेटायला ठाण्यात येतात. पण यावेळी त्यांनी फ्लाइटऐवजी कारनं येण्याचा निर्णय घेतला आणि 16 देश पार करून ते भारतात पोहोचले. ब्रिटनमधून बाहेर पडल्यानंतर, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, लिथुआनिया, लॅटव्हिया, एस्टोनिया, रशिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, चीन, तिबेट आणि नेपाळ हे देश पार करत आले. अखेर 59 दिवसांनी अनेक किलोमीटरचा प्रवास करून विराजित हे भारतात पोहोचले.

कसा केला प्रवास : लंडनहून ट्रीप सुरू केल्यानंतर विराज हे दररोज 400-600 किलोमीटर गाडी चालवत होते. अनेक वेळा त्यांना 1000 किलोमीटरपर्यंत गाडी चालवावी लागली. अनेकवेळा गाडी बंद देखील पडली. ब्रिटीश नागरिक असल्यानं त्यांना कोणत्याही देशात प्रवेश करताना फारसा त्रास झाला नाही असं त्याचं म्हणणं आहे. हा प्रवास करून त्यांनी इतिहास रचला आहे. हा संपूर्ण प्रवास करताना वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव घेत, येईल त्या परिस्थितीला सामोरे जात विराजित यांनी हा हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. कधी कधी पाऊस, थंडी आणि उन्हाचा अनुभव घेत आपल्या कारसोबत वेगवेगळ्या देशातील जेवण केल्याचा अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहील असं विराजित यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. अभिनेत्री ज्योतिकाने मित्रांसह गाठले माउंट एव्हरेस्ट, पाहा व्हिडिओ झलक - Jyotika Scaling Mount Everest
  2. Youngest child who reached Umling La : साडेतीन वर्षांच्या मुलानं लडाखमधील उमलिंग ला गाठून केला विक्रम
  3. पर्यावरण रक्षणासाठी निघालेल्या तिघांचं कोल्हापूरात स्वागत, 11 राज्यांतून केला 11 हजार किमी सायकल प्रवास - Travel for environmental protection

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.