हैदराबाद : सणासुदीच्या हंगामासाठी टाटा मोटर्सनं जोरदार तयारी केली आहे. विक्री वाढवण्यासाठी कंपनीनं आपल्या लोकप्रिय मिनी एसयूव्ही टाटा पंचच्या लाइनअपमध्ये कॅमो एडिशन पुन्हा लाँच केलीय. मात्र, यावेळी कारला मर्यादित युनिटमध्ये विकले जाईल.
Tata Punch Camo Edition : कंपनीने हे स्पेशल एडिशन 8.45 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले आहे. टाटा पंच कॅमो एडिशन, मूळत: 2022 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. टाटा पंच कॅमो एडिशन मिड-स्पेक अकम्प्लिश्ड प्लस आणि टॉप-स्पेक क्रिएटिव्ह प्लस व्हेरियंटसह ऑफर केली जात आहे. टाटा पंच कॅमो एडिशनची किंमत त्याच्या संबंधित नियमित व्हेरियंटपेक्षा 15 हजार रुपये जास्त आहे.
एक्सटीरियरमधील बदल : 2024 टाटा पंच कॅमो एडिशन आता व्हाईट रूफसह सीवीड ग्रीन एक्सटीरियर शेडमध्ये ऑफर करण्यात आली आहे. टाटा पंच कॅमोच्या मागील आवृत्तीसह उपलब्ध असलेल्या फोलिएज ग्रीन शेडपेक्षा वेगळी आहे. या मर्यादित एडिशन मायक्रो एसयूव्हीची सहज ओळख होण्यासाठी 16-इंच गडद राखाडी अलॉय व्हील्स आणि साइड फेंडरवर 'कॅमो' बॅज हा बाह्यभागातील आणखी एक लक्षणीय बदल आहे.
Tata Punch Camo Edition वैशिष्ट्ये : कारच्या आतील इंटेरियर बद्दल बोलायचं झालं तर, टाटा पंच कॅमो स्पेशल एडिशनमध्ये ऑल-ब्लॅक सीट अपहोल्स्ट्री, ब्लॅक आऊट डोअर ओपनिंग लीव्हर वापरण्यात आलं आहे. डोअर पॅडवर कॅमो ग्राफिक्सही दिलेले आहेत. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, यात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटो एसी आणि वायरलेस फोन चार्जर आहे. त्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग कॅमेरा आणि मागील पार्किंग सेन्सर यांचा समावेश आहे.
Tata Punch Camo पॉवरट्रेन पर्याय : कंपनीनं पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेन या दोन्ही पर्यायांसह बाजारात टाटा पंच लॉंच केलीय. त्यात फक्त एक 1.2-लीटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहे. पेट्रोलवर, हे इंजिन 87 bhp पॉवर आणि 115 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करतं. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. CNG इंधनाबद्दल बोलायचं झालं, तर हे इंजिन 72 bhp ची शक्ती आणि 103 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करतं. CNG पॉवरट्रेनमध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.
Tata Punch Camo किंमत : टाटा पंचची किंमत 6.13 लाख ते 10.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत Hyundai Exeter ला थेट टक्कर देणार आहे. तसंच कार मारुती फ्रँक्स आणि टोयोटा टसारलसोबतही स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :