मुंबई - मेगास्टार रजनीकांत टीजे ग्यानवेल लिखित आणि दिग्दर्शित 'वेट्टियांन' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांतने वेट्टियांनसाठी मोठी फी आकारली आहे. रजनीकांतने या चित्रपटासाठी तब्बल 100-125 कोटी रुपये फी घेतली आहे. याबद्दल मीडियामध्ये कलाकारांच्या फीबद्दल काय चर्चा सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.
चित्रपटातील कलाकारांची फी किती आहे?
तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी चर्चा आहे की रजनीकांत यांना 'वेट्टियांन'साठी 125 कोटी रुपये दिले गेले आहेत. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या भूमिकेसाठी 7 कोटी रुपये फी म्हणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. फहद फासिलला 2-4 कोटी रुपये दिले आहेत. तर राणा दग्गुबतीला 5 कोटी आणि अभिनेत्री मंजू वारियरला 85 लाख रुपये मिळाले आहेत. अभिनेत्री रितिका सिंगला तिच्या भूमिकेसाठी 25 लाख रुपये फी देण्यात आली आहे. याशिवाय दुशारा विजयन, राव रमेश, रोहिणी आणि इतर कलाकारांचाही या चित्रपटातील वेट्टियांनच्या कलाकारांमध्ये समावेश आहे. लायका प्रॉडक्शन निर्मित हा एका धमाकेदार क्राईम ड्रामा चित्रपट आहे.
या चित्रपटात रजनीकांतचे पात्र एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून दाखवण्यात आले आहे. तर अमिताभ त्याच्या विरुद्ध दाखवण्यात आला आहे जो त्याच्या एन्काउंटर स्टाईलच्या विरुद्ध आहे. 'वेट्टियांन' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर 11 कोटी वेळा पाहण्यात आला आहे. या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे.
'वेट्टियांन' चित्रपट रिलीज होण्याआधीच, 97 हजार अमेरिकन डॉलर (सुमारे 80 लाख रुपये) इतकी कमाई केली आहे. सुमारे 4,000 आगाऊ तिकिटांच्या विक्रीतून चित्रपटाने ही कमाई केली आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.