ETV Bharat / state

राहुल गांधींनी दिली टेम्पो चालकाच्या घरी भेट; किचनमध्ये बनवली चक्क वांग्याची भाजी - Rahul Gandhi Maharashtra Visit - RAHUL GANDHI MAHARASHTRA VISIT

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापुरात टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी किचनचा ताबा घेत वांग्याची आणि हरभऱ्याची भाजी केली.

Rahul Gandhi Maharashtra Visit
टेम्पो चालक कुटुंब (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 2:36 PM IST

Updated : Oct 5, 2024, 3:38 PM IST

कोल्हापूर : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता विमानतळावर राहुल गांधी यांचं आगमन झालं. यावेळी त्यांनी कार्यक्रमस्थली न जाता थेट कोल्हापुरातल्या उचगाव इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात राहणाऱ्या टेम्पो चालक अजित तुकाराम सनदे यांच्या घरी भेट दिली. अचानक राहुल गांधीच घरात आल्यानंतर सनदे कुटुंबीय भारावून गेलं.

राहुल गांधी यांनी सर्वांनाच दिला सुखद धक्का : खासदार राहुल गांधी हे सनदे यांच्या घरी अर्ध्या तासांहून अधिक काळ थांबले. यावेळी राहुल गांधी यांनी सर्वांनाच एक सुखद धक्का दिला. राहुल गांधी हे नेहमीच सामान्य माणसांशी नातं जपण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कोल्हापूर दौऱ्यातही त्यांनी आपली भारत जोडण्याची ही खासियत जपलीय. आज ही सनदे यांच्या सामान्य घरात जाऊन राहुल गांधी यांनी चहा, नाश्ता घेतला. यावेळी "राहुल गांधी घरी आल्यानंतर कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं," अशी प्रतिक्रिया या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली. तसंच त्यांनी स्वतः किचनचा ताबा घेऊन वांग्याची आणि हरभऱ्याची भाजी केल्याची माहितीही सनदे यांच्या पत्नीनं दिली.

राहुल गांधींनी दिली टेम्पो चालकाच्या घरी भेट (Source : ETV Bharat Reporter)

राहुल गांधी अचानक उचगावात : शुक्रवारी विमानात बिघाड झाल्यानंतर राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी राहुल गांधी छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणार अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. नवी दिल्लीहून सकाळी दहा वाजता राहुल गांधी यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं. कोल्हापूर विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या उचगावातील सनदे कुटुंबाच्या भेटीला खासदार राहुल गांधी निघाले. अतिशय सामान्य कुटुंब असलेल्या सनदे यांच्या घरी राहुल गांधी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून पोहोचले. सनदे यांच्या घरात राहुल गांधी यांनी चहा नाश्ता केला. त्यामुळे ही अनोखी घटना असल्याची प्रतिक्रिया सनदे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. राहुल गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल; शिवरायांचा पुतळा पडण्याचं सांगितलं कारण - Rahul Gandhi Reach At Kolhapur
  2. कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट - Rahul Gandhi Kolhapur
  3. "मोहब्बत की दुकानात काय चाललंय?", कोरपना अत्याचार प्रकरणावरुन चित्रा वाघ यांंचा राहुल गांधींसह विरोधकांवर हल्लाबोल - Chandrapur Girl Abused

Last Updated : Oct 5, 2024, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.