ETV Bharat / sports

मुंबईचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला; सामना अनिर्णित राहूनही 'अजिंक्य' नेतृत्वाखाली कोरलं इराणी चषकावर नाव - Mumbai Won Irani Cup

Mumbai Won Irani Cup 2024: मुंबईनं 27 वर्षांनतर इराणी चषकावर नाव कोरलंय. हा सामना अनिर्णित राहिला. मात्र मुंबईनं विजय मिळवला.

author img

By ETV Bharat Sports Team

Published : 2 hours ago

Updated : 1 hours ago

Mumbai Won Irani Cup 2024
सर्फराज खान (AP Photo)

लखनऊ Mumbai Won Irani Cup 2024 : इराणी चषक 2024 चा सामना मुंबई आणि 'रेस्ट ऑफ इंडिया' यांच्यात खेळला गेला. हा सामना अनिर्णित राहिला. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई संघानं इराणी चषक 2024 चं विजेतेपद पटकावण्यात यश मिळवलं आहे. मुंबईनं पहिल्या डावात एकूण 537 धावा केल्या होत्या. त्यात सर्फराज खाननं द्विशतक झळकावलं आणि अजिंक्य रहाणेनंही उत्कृष्ट खेळी केली. यानंतर 'रेस्ट ऑफ इंडिया'चा संघ पहिल्या डावात 416 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे मुंबईला 121 धावांची आघाडी मिळाली, जी विजयात महत्त्वाची ठरली. यानंतर मुंबईनं 329 धावांवर दुसरा डाव घोषित केला.

सर्फराज खाननं झळकावलं द्विशतक : मुंबईसाठी पहिल्या डावात सर्फराज खान सर्वात मोठा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात 286 चेंडूत 222 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेनं 97 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं 64 आणि तनुष कोटियननं 64 धावा केल्या. या खेळाडूंच्या शानदार खेळीमुळे मुंबई संघानं पहिल्या डावात 537 धावा केल्या. तर मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा पृथ्वी शॉ आणि आयुष म्हात्रे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर हार्दिक तामोरेही काही विशेष दाखवू शकला नाही. सर्फराजनं द्विशतक झळकावून मुंबईला सामन्यात परत आणलं. तो एका बाजूनं धावा करत राहिला.

अभिमन्यू ईश्वरनचं शतक व्यर्थ : यानंतर फलंदाजासाठी आलेल्या 'रेस्ट ऑफ इंडिया'चा कर्णधार ऋतुराज गायकवाड पहिल्या डावात काही खास दाखवू शकला नाही आणि 9 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र अभिमन्यू इश्वरननं 16 चौकार आणि 1 षटकारासह 191 धावा केल्या. तर ध्रुव जुरेलनं 93 धावांची खेळी केली. संघात पुनरागमनाची आशा असलेल्या इशान किशनला केवळ 38 धावा करता आल्या. 'रेस्ट ऑफ इंडिया'चे बाकीचे फलंदाज प्रचंड फ्लॉप ठरले आणि त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. या कारणामुळं त्यांना केवळ 416 धावा करता आल्या. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर 'रेस्ट ऑफ इंडिया'चा पराभव जवळपास निश्चित झाला होता.

मुंबईनं 27 वर्षांनंतर कोरलं इराणी चषकावर नाव : मुंबईकडून पृथ्वी शॉनं दुसऱ्या डावात 76 धावा केल्या. तनुष कोटियननं दुसऱ्या डावात शतक झळकावून सर्वात मोठी प्रसिद्धी मिळवली. त्यानं 150 चेंडूत 114 धावा केल्या, ज्यात 10 चौकार आणि 1 षटकार आहे. त्याच्याशिवाय मोहित अवस्थीनं 51 धावांचं योगदान दिलं. मुंबईनं 329 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. मुंबई संघानं 27 वर्षांनंतर इराणी चषक जिंकला आहे. याआधी मुंबईनं 1997 मध्ये इराणी चषक जिंकला होता.

हेही वाचा :

  1. भारतीय संघात एकच सलामीवीर, आता बांगलादेशविरुद्ध कोण करणार डावाची सुरुवात? - IND vs BAN 1st T20I
  2. दहशतवाद्यांना पकडणारे IPS अधिकारी आता सांभाळणार BCCI ची महत्त्वाची जबाबदारी - BCCI Anti Corruption Unit

Last Updated : 1 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.