नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू विकार तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मेंदूच्या विकारांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. चंद्रशेखर मेश्राम हे मेंदूच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम अनेक वर्षांपासून रुग्णसेवेसह करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या बद्दल माहिती : डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम हे नाव नागपूरकरांना परिचित आहे. 1987 पासून ते न्यूरोलॉजिस्ट म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचं वैद्यकीय शिक्षण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालं आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगडमधून एमडी मेडिसिन, एमडी न्यूरोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. 2022 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 65 वर्षांच्या इतिहासात या पदावर निवड झालेले ते देशातील पहिले न्यूरोलॉजिस्ट आहेत. 123 सदस्य देश असलेल्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे जगात फक्त तीन विश्वस्त आहेत. एका छोट्या गावातून शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांचा प्रवास वर्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या विश्वस्त पदापर्यंत पोहचला आहे.
डॉ. मेश्राम यांच्या उपलब्धी : वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या, ट्रॉपिकल आणि जिओग्राफिकल न्यूरोलॉजी विभागाचे अध्यक्ष आहेत. 2017 पासून आणि 2021 या पदावर त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. वैज्ञानिक कार्यक्रम समिती, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी 2017-2021 सदस्य, घटना आणि उपविधी समिती, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी, 2012 ते 2019 बँकॉक, माराकेश, व्हिएन्ना, स्टॉकहोम, सँटियागो, क्योटो आणि दुबई येथे, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या प्रतिनिधींच्या 7 परिषदेमध्ये राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेस्टर्न पॅसिफिक समितीवर सदस्य अध्यक्ष आहेत, इंडियन अकॅडेमि ऑफ न्यूरॉलॉजि,2023-2024 सचिव, इंडियन अकॅडेमि ऑफ न्यूरॉलॉजि माजी अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजी आणि विदर्भ न्यूरो सोसायटी. 2004 मध्ये इंडियन अकादमी ऑफ नूरोलॉजिच्या वार्षिक कॉन्फरेन्सचे आयोजन. 2017 मध्ये पहिल्या इंटरनॅशनल ट्रॉपिकल नूरोलॉजि कॉन्फरेन्सचे आयोजन, सचिव जर्नल ऑफ न्यूरोलॉजिकल सायन्सेसच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी आवृत्तीचे सहसंपादक एनसायक्लोपीडिया ऑफ न्यूरोसायन्स विभाग संपादक (उष्णकटिबंधीय रोगांसह, जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग रोगासाठी ) इ. नुरोलॉजिकल सायन्सेसचे सह संपादक राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक व्याख्यानं.
18 आंतरराष्ट्रीय संशोधन उपक्रमामध्ये सहभाग : मुख्य समन्वयक, सार्वजनिक आरोग्य शैक्षणिक उपक्रम, इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजी. (2014 पासून) सार्वजनिक आरोग्य शिक्षणासाठी वर्तमानपत्रांमध्ये 400 प्रकाशने. गेल्या 30 वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित. पक्षाघात, स्मृतिभ्रश, पार्किन्सन'स डिसीज, मिरगी, डोकेदुखी, ऑटिसम, मेंदूज्वर इत्यादी रोगावर वर्षभर जनजागरणाचे कार्यक्रम त्यांनी केले आहे.
विश्वस्त : बाबा आमटे महारोगी सेवा समिती, वरोरा, विदर्भ साहित्य संघ, आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम सदस्य आहेत
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे सम्मान पुरस्कार : इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजी तर्फे 11 वर्षे दिलेल्या योगदानाबाबद्दल सत्कार, 2016 मध्ये कलकत्ता येथे राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे, 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव पुरस्कार'. 2017 मध्ये ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागाचे अध्यक्ष नियुक्त झाल्याबद्दल 2017 मध्ये डॉ. वानकर जीवनगौरव पुरस्कार. 2019 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागरी सत्कार. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. मेश्राम यांच्या सत्कार करण्यात आला आहे.
इतर उपक्रम : आतापर्यंत झालेल्या सहा ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनात त्यांचा महत्वाचा सहभाग. सम्यक मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष, 50 गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कोर्स डायरेक्टर WFN -IAN FINE न्यूरोइन्फेक्शन मालिकामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
हे वाचलंत का :