ETV Bharat / state

'एक्स बॉयफ्रेंड'ला तरुणीच्या प्रियकराकडून चिरडण्याचा प्रयत्न - X Boyfriend Accident - X BOYFRIEND ACCIDENT

Pimpri Chinchwad X Boyfriend Accident : पुण्यात अपघातांचं सत्र सुरूच असल्याचं चित्र पहायला मिळतंय. पुण्यातील पोर्श कारचं अपघात प्रकरण ताजं असतानाच आता पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणानं प्रेमप्रकरणातून तरुणीच्या एक्स बॉयफ्रेंडला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेत नीलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pimpri Chinchwad X Boyfriend Accident
पिंपरी चिंचवड एक्स बॉयफ्रेंडचा अपघात प्रकरण (Reporter ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 4:00 PM IST

पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad X Boyfriend Accident : पुणे अपघात प्रकरणानंतर पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला तरुणीच्या प्रियकरानं चिरडण्याचा प्रयत्न केलाय. ही घटना पिंपरीत मध्यरात्री एक वाजता घडली. या अपघातात नीलेश शिंदे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशील काळे, असं आरोपीचं नाव असून त्याला पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

प्रेयशीमुळं घडला प्रकार : पोर्श कार प्रकरणावरून पुणे शहर सध्या चर्चेत असताना अशा घटनेनं राज्यातील तरुणांना कायद्याचा धाक नसल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील काळे याला अटक केली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना टेल्को रोड यशवंत नगर येथे पहाटे एकच्या सुमारास घडली. निलेश शिंदे तसंच सुशील काळे यांची एकच प्रेयशी आहे. सध्या ही तरुणी सुशील काळेसोबत रिलेशनशिपमध्ये असून ती निलेशपासून वेगळी झाली आहे. नीलेश प्रेयसीला रात्री उशिरा भेटण्यासाठी आला. तरुणीनं याबाबतची माहिती सुशीलला दिली. तेव्हा नीलेश तरुणीशी बोलत असताना सुशीलनं नीलेशला चारचाकीने धडक दिली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रियकरावर गुन्हा दाखल : या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून प्रियकराला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलीस सर्व माहिती घेत आहेत. हा वाद फक्त मैत्रिणीबद्दल होता, की इतर कोणत्या कारणानं झाला? याबाबत पोलीस तपास करत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसतेय. कोयता गँग, पोर्श कार प्रकणामुळं पुणे शहराचं नाव सध्या देशात चर्चेचा विषय ठरतंय. शिक्षणाचं माहेरघर असणारे पुणे शहर आता खरच सुरक्षित आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. तसंच काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

हे वाचलंत का :

  1. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी फेकून दिले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची खळबळजनक माहिती - Porsche car accident case
  2. 'मी' मध्यमवर्गीय असल्यानं माझ्यावर पोर्श कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, आर्यन नीखराचा आरोप - Pune hit and run case
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी - Pune Hit And Run Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.