ETV Bharat / state

धक्कादायक! प्रियकरानं प्रेयसीची हत्या करून मृतदेह ठेवला रिक्षात, पिंपरीत खळबळ - Pimpri Chinchwad Crime - PIMPRI CHINCHWAD CRIME

Pimpri Chinchwad Crime News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानं प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षामध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. या प्रकारानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

boyfriend killed his girlfriend and left her body in rickshaw in Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2024, 8:47 AM IST

पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Crime News : ऐन गणेशोत्सवात पिंपरी- चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या करून, तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक आवळे आणि मृत तरुणी गेल्या चार ते पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सदरील तरुणीचं लग्न झालेलं होतं. मात्र, 2018 साली तिच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर तिचे आरोपी विनायक आवळेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षांपासून दोघंही लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र, मंगळवारी रात्री दोघांमध्ये वाद झाले. रागाच्या भरात विनायकने तरुणीची हत्या केल्याचा संशय आहे. तसंच हत्या केल्यानंतर त्याने तरुणीचा मृतदेह रिक्षात टाकून तो रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभा केला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही हत्या प्रियकर विनायकनं केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचली असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतच अली अन्सारी नामक तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता एका तरुणीचा गळा घोटण्यात आलाय. त्यामुळं पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये हत्या सत्र सुरू होतंय की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसंच गणपतीची प्रतिष्ठापना झाली तेव्हापासून अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यांमुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

हेही वाचा -

  1. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत शेजाऱ्याच्या तरुणाकडून बलात्कार - Minor Rape Case Thane
  2. जळगाव हादरलं! 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन डोकं दगडानं ठेचलं; 'नराधमाला फाशी द्या' संतप्त जमावाची मागणी - Minor Girl Rape Murder Case
  3. प्रॉपर्टीच्या वादातून बहिणीचे केले तुकडे-तुकडे अन् दिले नदीत फेकून; भाऊ, पत्नी अटकेत - Brother Killing Sister Pune

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.