ETV Bharat / state

“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे”; ईमेलवरील धमकीनं नागपुरात खळबळ; पोलीस यंत्रणा लागली कामाला - BOMB THREAT EMAIL

नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आलीय. द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल हॉटेलला प्राप्त झाला आहे.

Bomb In Hotel
हॉटेलमध्ये बॉम्ब (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2024, 5:17 PM IST

नागपूर : शहरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक ई-मेल हॉटेलला प्राप्त झाल्यानंतर नागपुरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण हॉटेल तपासलं. मात्र, हॉटेलमध्ये कुठली संशयास्पद वस्तू सापडली नाही. कुणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी फेक ई-मेल पाठवला असल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी दिली.

हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल : आज सकाळच्या सुमारास द्वारकामाई हॅाटेलमध्ये बॅाम्ब असल्याचा एक मेल हॉटेल व्यवस्थापनाला प्राप्त झाला. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचं त्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं. हॉटेल व्यवस्थापकांनी लगेच या बाबतची माहिती गणेश पेठ पोलिसांना कळवली. पोलीस देखील लगेचच घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय अग्निशामक दल आणि बॅाम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं.

प्रतिक्रिया देताना राहुल माकनीकर (ETV Bharat Reporter)

संपूर्ण हॉटेल पिंजून काढलं : पोलिसांच्या पथकानं हॉटेलच्या आत बॉम्ब शोध सुरू केली. हॉटेलमध्ये कामाला असलेला स्टाफ आणि गेस्टला सुरक्षिततेसाठी बाहेर काढण्यात आलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉटेल परिसरात दाखल झाले होते. मात्र, संपूर्ण हॉटेल पिंजून काढल्यानंतर कोणतीही संशयास्पद किंवा घातक वस्तू आढळून आली नसल्यानं पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.

फेक ईमेल करणाऱ्याचा शोध सुरू : या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी सांगितलं, "हॉटेलला एक मेल आला होता. त्यानंतर आम्ही संपूर्ण तपासणी केली, त्यात चौकशीमध्ये सध्या काहीचं मिळून आलं नाही. ईमेल कुठून आला होता याची चौकशी करण्यात येईल".

दिल्लीतील दोन शाळांना बॉम्बस्फोटनं उडवण्याची धमकी : आज दिल्लीतील दोन नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात माथेफिरुनं ईमेल करुन ही धमकी दिली आहे. आर के पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल आणि पश्चिम विहारमधील जीडी गोएंका पब्लिक स्कूलला बॉम्बस्फोटनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना दिल्ली पोलिसांनी सांगितलं, "दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. आरके पुरममधील आणि दुसरी पश्चिम विहारमधील या शाळा आहेत. शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना घरी परत पाठवलं आहे. अग्निशमन दल विभाग आणि पोलिसांना सकाळी सात वाजता माहिती देण्यात आली आहे."

हेही वाचा -

  1. दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; विद्यार्थ्यांना पाठवलं परत, पालक हादरले
  2. पुन्हा धमकीनं हादरला 'भाईजान'; शूटींग चालू असताना फॅन म्हणाला 'लॉरेन्स बिश्नोईको बुलाऊ क्या'
  3. सलमान खानला पुन्हा धमकी ; 5 कोटी रुपये दे, अन्यथा . . .नियंत्रण कक्षाला लॉरेन्स बिश्नोईच्या कथित भावाचा मेसेज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.