ETV Bharat / state

सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी पालिका कर्मचाऱ्यांना करावा लागला तांत्रिक अडचणींचा सामना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 11:02 PM IST

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. मंगळवारी २३ जानेवारी २०२४ पासून सुरू झालेले हे सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. (State Backward Classes Commission) या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ३० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण आणि कमी कालावधी मिळाल्यानं विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. (BMC Survey)

BMC staff faced technical difficulties
बीएमसी

मुंबई : पालिका कर्मचाऱ्यांकडे सर्वेक्षणासाठी मिळालेला कालावधी अत्यंत कमी असल्यानं त्यांना दिवसाला साधारण चार लाख घरांचा सर्वे करणे गरजेचे आहे. मात्र, टार्गेट जास्त असूनसुद्धा या कर्मचाऱ्यांना योग्य असे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशीच काही कर्मचाऱ्यांना त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील देण्यात आले नव्हते. (Maratha Reservation) तर, काही कर्मचाऱ्यांना तर इंटरनेट तसेच सदर एप्लीकेशन मधील तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. याबाबतची माहिती पालिकेचे सहआयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.

घरोघरी जाऊन सर्वे: सध्या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पालिकेचे कर्मचारी मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांच्या ओळखपत्राची पडताळणी करून त्यांना सहकार्य करावं, असं आवाहन पालिकेचे अतिरिक्ति आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालिका क्षेत्रात सुमारे ३९ लाख घरांमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी २ लाख ६५ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सोबतच, सर्वेक्षणासाठी माहिती देणे ही ऐच्छिक बाब असल्याचेही सहआयुक्त शिंदे यांनी म्हटले आहे.

नागरिकांना सहकार्याचं आवाहन: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे ३८ लाखांपेक्षा अधिक घरे असून प्रत्येक प्रगणकाने १५० घरांचे सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे. याप्रमाणे सुमारे ३०,००० इतके मनुष्यबळ सर्वेक्षणासाठी कार्यरत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अत्यावश्यक सेवा अबाधित ठेवून सर्वेक्षण करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती सर्वेक्षणाच्या निमित्तानं घेत आहेत. परंतु काही ठिकाणी सर्वेक्षणाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

समस्यांचं निराकरण तात्काळ: याबाबत अधिक माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे कळविण्यात आलं आहे की, राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या ‘मास्टर ट्रेनर’ने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नोडल ऑफीसर, असिस्टंट नोडल ऑफीसर आणि मास्टर ट्रेनर यांना याआधीच प्रशिक्षण दिलं आहे. सुरुवातीला सर्वेक्षणाच्या सॉफ्टव्हेअरमध्ये काही समस्या आढळल्या होत्या. परंतु, या समस्यांचं निराकरण तात्काळ करण्यात आलं आहे. त्यामुळे दिनांक २३ जानेवारी २०२४ पासून १७ हजार ३४५ प्रगणकांना युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त झाला असून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. सॉफ्टवेअर मधील तांत्रिक अडचणी असूनही पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ६५ हजार १२० इतक्या घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

हेही वाचा:

  1. रोहित पवार यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी, रात्री उशिरा आले कार्यालयाबाहेर
  2. ममता बॅनर्जी 'इंडिया' आघाडी सोबतच, सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य
  3. जरांगेंचं आंदोलन परवानगी घेऊन शांततेत होईल याची जबाबदारी शासनाची - मुंबई उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.