ETV Bharat / state

पावसामुळं अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांसाठी गुडन्यूज; 29 जुलैपासून मुंबईतील पाणी कपात रद्द - Mumbai Water Cut - MUMBAI WATER CUT

Heavy Rain In Mumbai : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळं मुंबईत लागू असलेली 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

Mumbai Water Cut
ओसंडून वाहणारे जलाशय (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 10:45 AM IST

मुंबई Heavy Rain In Mumbai : मुंबईसह राज्यात पावसानं चांगलाच जोर धरलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेनं मुसळधार पावसातही मुंबईकरांना एक आनंदाची बातमी दिली आहे. महापालिकेनं सोमवार 29 जुलैपासून शहराच्या पाणी पुरवठ्यातील सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणी कपात मागं घेत असल्याचं जाहीर केलंय. ठाणे शहर, भिवंडी आणि शहराच्या बाहेरील विभागातील ग्रामपंचायतींना देखील मुंबई महापालिका पाणी पुरवठा करते. या पाणी पुरवठ्यात देखील 5 टक्के कपात करण्यात आली. आता ही 5 टक्के पाणी कपात देखील मागं घेण्यात आल्याचं महापालिकेनं जाहीर केलंय.

सोमवारपासून पाणीकपात मागं : मुंबईसह राज्यात पावसानं चांगलाच जोर धरलाय. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरणांचा जलसाठा वाढला आहे. त्यामुळं मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली 10 टक्के पाणी कपात मागं घेण्यात आली आहे. सोमवार दिनांक 29 जुलैपासून पाणीकपात मागं घेण्यात आल्याचं महापालिकेनं म्हटलं.

पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ : बृहन्मुंबई महानगरपालिका महामुंबईला आपल्या अखत्यारीतील 7 धरणांतून पाणी पुरवठा करते. या 7 धरणांमधील एकूण पाणीसाठा केवळ 5 टक्क्यांवर आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 10 टक्के पाणीकपात लागू केली. मात्र, आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होत असल्याचं महापालिकेनं म्हटलं. या संदर्भात बोलताना महापालिकेचे मुख्य जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितलं की, "मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होत आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर ही चार जलाशय पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत. आज सकाळी 6 वाजता जलाशयातील पाणीसाठा 66.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता सोमवार, 29 जुलै 2024 पासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील 10 टक्के पाणीकपात मागं घेण्यात येणार आहे."

चार तलाव ओसंडून वाहू लागले : सध्या विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे चार तलाव ओसंडून वाहत असून, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा या तीन मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. या सात धरणांमार्फत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला दररोज 385 दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या सातही जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं पाणी कपातीचा निर्णय मागं घेण्यात आल्याचं महापालिकेनं जाहीर केलं आहे.

हेही वाचा

  1. मुसळधार पावसामुळं हवाई वाहतूक विस्कळीत; मुंबई विमानतळावरील उड्डाणं रद्द, प्रवाशांना फटका - Heavy Rain Hit Flights
  2. साताऱ्यातील वाईमध्ये महिला गेली ओढ्याच्या पुरात वाहून, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद - Heavy Rainfall in Maharashtra
  3. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा, प्रशासन हाय अलर्टवर - Kolhapur Floods
  4. कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटाने उघडले, ११०५० क्युसेक्स पाणी सोडलं - Koyna Dam Satara

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.