ETV Bharat / state

अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती, राम गीत गाऊन केली प्रभू श्रीरामाची आराधना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 10:35 PM IST

Updated : Jan 22, 2024, 12:39 PM IST

अंध विद्यार्थिनी श्रेया शिंपी हिने राम गीत गाऊन प्रभू श्रीरामाची आराधना केलीय. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी तिनं हे गीत अर्पण केल्याचं सांगितलंय.

Shreya Shimpi
श्रेया शिंपी

ठाणे : जन्मतः अंध असली तरी प्रभू श्रीरामाप्रती तिची भक्ती मात्र डोळस आहे. ठाण्यातील 11 वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मतः अंध असून तिला अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला, तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी ती चक्क रामनामाचं गाणं गाऊन रसिक भाविकांचं लक्ष वेधत आहे.

श्रेयानं आजपर्यत 200 गाणी गायली : ठाण्यातील पाचपाखाडी टेकडी बंगला येथील अष्टविनायक दर्शन सोसायटीत राहणारी श्रेया शिंपी ही राहुल, स्वाती शिंपी या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे. 2012 साली जन्मलेली श्रेया जन्मतः अंध असून इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. दोन्ही नेत्रानी दिव्यांग असली, तरी श्रेया नौपाड्यातील ब्राम्हण विद्यालयात शिकते. प्रत्येक परीक्षेत शाळेत ती नेहमीच पहिली येते. श्रेयाचे आजोबा घरच्या घरी हार्मोनियम, बासरी वाजवत असत. एवढाच काय तो कलेचा वारसा शिंपी घराण्यात आहे. मात्र, श्रेया बालपणापासूनच संगीत, गायन कलेत पारंगत आहे. श्रेयानं आजपर्यत 200 गाणी गायली आहेत. तसंच अनेक गाण्याच्या स्पर्धा, कार्यक्रमांमध्ये श्रेयानं आपल्या कलेचे सादरीकरण केल्याचं तिचे आईवडील सांगतात.

गीत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अर्पण : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात राम नामाचा जागर होत आहे. या पार्श्वभूमीवर गीतकार प्रविण भालेराव यांनी रचलेल्या तसंच संगीत संयोजक अनिल वैती यांनी कंपोझ केलेल्या श्री रामावरील " बोलो राम राम राम" या गाण्यासाठी त्यांना सुयोग्य असा आवाज हवा होता. त्यासाठी अनेकांच्या चाचण्या त्यांनी घेतल्या, मात्र चिमुकल्या श्रेयाच्या आवाजाची त्यांना भुरळ पडली. पहिल्याच प्रयत्नात श्रेयानं हे गाणे गाऊन एक वेगळा अविष्कार दाखवला आहे. श्रेया लौकिकार्थाने पाहू शकत नसली तरी स्वावलंबी आहे. ती अभ्यासासोबतच आपली सर्व कामं स्वतःच करते. तिला प्रभुश्रीरामासाठी गाणं गाण्याची तिची इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. "बोलो राम राम राम" हे गीत अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अर्पण केल्याचं श्रेया सांगते.

हेही वाचा -

  1. अखेर प्रतीक्षा संपली; रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक आली पुढं, गर्भगृहात विराजमान
  2. रामलल्ला गर्भगृहात होणार विराजमान : राम जन्मभूमीत तिसऱ्या दिवशी धार्मिक विधींचा उत्साह
  3. पंतप्रधान मोदींकडून राम मंदिरावरील टपाल तिकीट जारी

Last Updated : Jan 22, 2024, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.