ETV Bharat / state

सचिन वाझेंच्या आरोपांनी भाजपाच्या हातात आयतं कोलीत; अनिल देशमुख खंडणी प्रकरणावरुन पुन्हा उडणार 'भडका' - Sachin Vaze vs Anil Deshmukh

Sachin Vaze vs Anil Deshmukh : अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. मात्र या वादात आता भाजपा नेत्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा 100 कोटी खंडणी वसुली प्रकरणात मिळालेला जामीन रद्द करण्यात येण्याची मागणी केली आहे.

Sachin Vaze vs Anil Deshmukh
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 12:44 PM IST

Updated : Aug 3, 2024, 1:02 PM IST

सचिन वाझेंच्या आरोपांनी भाजपाच्या हातात आयतं कोलीत (Reporter)

मुंबई Sachin Vaze vs Anil Deshmukh : मागील काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात शंभर कोटी प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. त्यातच बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या वक्तव्यानं आगीत तेल टाकण्याचं काम केलं आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर आता भाजपा नेत्यांच्या हातात आयतं कोलीत लागलं. अनिल देशमुख प्रकरणावरुन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतलं आहे. दुसरीकडं भाजपा नेत्यांनी अनिल देशमुख यांचा जामीन तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही भाजपा नेत्यांनी केली.

Sachin Vaze vs Anil Deshmukh
सचिन वाझे (Reporter)

अनिल देशमुखांवर शंभर कोटी प्रकरणात गंभीर आरोप : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी प्रकरणात गंभीर आरोप केले. अनिल देशमुख यांच्याकडं त्यांच्या पीए मार्फत पैसे जात होते, याचे पुरावे सुद्धा सीबीआयकडं आहेत. सचिन वाझे यांनी स्वतः पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना शंभर कोटी वसुलीची माहिती आणि पुरावे दिले आहेत. याप्रकरणी सचिन वाजे यांनी या प्रकरणी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे, असं सांगितल्यानं या प्रकरणाला नवीन वळणं लागलं आहे. इतकंच नाही, तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं सुद्धा नाव असल्याचं सचिन वाझे यांनी सांगितल्यानं खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आल्या नाहीत.

Sachin Vaze vs Anil Deshmukh
प्रसाद लाड (Reporter)

सचिन वाझेला कोणाचा आशीर्वाद ? : या प्रकरणावर बोलताना भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. अनिल देशमुख त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून पैशाची वसुली करत होते, हा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. हा अतिशय गंभीर आरोप आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला, त्यामध्ये त्यांनी जे आरोप केले, त्याचा पुनरुच्चार सचिन वाझे यांनी केला. शंभर कोटीची वसुली असेल, डान्सबारचे पैसे असतील, मनसुख हिरेनची हत्या असेल, याव्यतिरिक्त अंबानी यांच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचं प्रकरण असेल हे सर्व कृत्य करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तो सचिन वाझे यांनी केला. सचिन वाझे यांना तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता. म्हणून सचिन वाझेला पुन्हा नोकरीत आणताना त्या पेपरवर सह्या कुणाच्या घेतल्या, त्याला आशीर्वाद कोणाचा होता, हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे. सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपाची चौकशी व्हायला पाहिजे. या प्रकरणी एसआयटी नेमून सचिन वाझे यांची पुन्हा चौकशी व्हायला पाहिजे. त्याची सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे. यामध्ये वेळप्रसंगी अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करून ज्याप्रकारे अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत, त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. त्या चौकशीमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री आणि इतर कुठल्या मंत्र्यांचा सहभाग होता, हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा जावई : या मुद्द्यावर बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा जावई होता. तो जेव्हा बोलतो तेव्हा सत्य बाहेर आणण्याचा हा प्रकार आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतर लोकांच्या घरी दगडं मारू नयेत, हे आज अनिल देशमुख यांना समजलं असेल. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनिल देशमुख हे पेन ड्राईव्ह हलवत आरोप करत होते. आता सचिन वाझे यांनी सत्य सांगितलं आहे, त्याबाबत सुद्धा एखादा पेन ड्राईव्ह आम्हाला दाखवा. सचिन वाझे असंच बोलत राहिला तर आज नाहीतर उद्या अनिल देशमुख आणि इतर कितीतरी नेते आर्थर रोड जेलमध्ये दिसतील. त्याचा हिशोबच करता येणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

सचिन वाझे कोण आहेत, संजय राऊतांचा सवाल : सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली प्रकरणावरुन गंभीर आरोप केले आहेत. याबाबत उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना आज पुण्यात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी कोण आहेत, सचिन वाझे असा सवाल केला. आरोपी आहेत, कुठं आहेत, ते सध्या, साबरमती आश्रमात आहेत ? पवनार आश्रमात आहेत, असंही ते म्हणाले. पराभव टाळण्यासाठी भाजपा अशा महाभागांना पुढं करते, अनिल देशमुखांनी काही माहिती पुढं आणली, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवं होतं. मात्र त्यांना त्यासाठी तुरुंगातील प्रवक्ता लागतो, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. "...तर आज उद्धव ठाकरे जेलमध्ये असते", अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट - Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
  2. अनिल देशमुख-देवेंद्र फडणवीस वादात आता समित कदमांची एन्ट्री, नेमकं काय आहे प्रकरण? - Amit Deshmukh Vs Samit Kadam
  3. "माझ्या वडिलांना मेडिकलवर नाही तर मेरिटवर जामीन मिळाला" - Salil Deshmukh

Last Updated : Aug 3, 2024, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.