अकोले (अहमदनगर) Bike Thief Arrested : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी व राजूर इथून दोन बुलेट गाड्या चोरीला गेल्या होत्या. या गाड्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा करण्याची पद्धत पाहुन व सीसीटीव्ही फुटेज तपासून गोपनीय बातमीदारानं दिलेल्या माहितीवरुन घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर एकनाथ गांगड या संशयित ईसमास ताब्यात घेतलं.
चोरट्याकडून 10 मोटरसायकल जप्त : या इसमाची सखोल चौकशी केली असता त्यानंच त्याच्या साथीदारांसोबत शेंडी व राजुर इथून दोन बुलेट गाड्यांची चोरी केल्याची कबुली दिली. तसंच या संशयिताला अधिक विश्वासात घेऊन चौकशी कल्यानंतर त्यानं ठाण्यातील शहापुर व नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतुनही आणखी 8 मोटारसायकल चोरी केल्याची माहीती दिलीय. यानंतर राजुर पोलिसांनी या इसमाकडुन 10 रेसर गाड्या ताब्यात घेतल्या असुन 10 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
वकिल दाम्पत्याच्या खूनानं हादरला होता अहमदनगर जिव्हा : जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणाऱ्या अॅड. राजाराम जयवंत आढाव (52) आणि अॅड. मनिषा आढाव (42) या दाम्पत्याचा खून केल्याची घटना 26 जानेवारी रोजी उघडकीस आली होती. दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते, त्यातच 26 जानेवारीला त्या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये हे मृतदेह आढळून आले होते. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
हेही वाचा :
- अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात दुहेरी हत्याकांड; चोर समजून मारहाण करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- एका हातात कोयता अन् दुसऱ्या हातात मुंडकं! बायकोची हत्या करून नवरा फिरला गावभर
- स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 84 वर्षीय व्यक्तीला 9.40 कोटींचा गंडा; बँकेच्या माजी अधिकाऱ्याला अटक
- पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीतील हॉटेलमध्ये हत्या, बंगाली जोडप्याला अटक; वाचा फिल्मी स्टाईल कहाणी