ETV Bharat / state

INDIA Alliance Rally : तेजस्वी यादव, स्टॅलिन, सौरभ भारद्वाज यांचा भाजपावर हल्लाबोल; EVM विरोधात लढण्याचा निर्धार - lok sabha elections

INDIA Alliance Rally in Mumbai : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. यानिमित्तानं 'इंडिया' आघाडीनं लोकसभा निवडणुकांचं रणशिंग मुंबईतील शिवाजी पार्कमधील सभेतून फुंकलंय. या सभेला इंडिया आघाडीतील दिग्गज नेते हजर होते.

Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay Yatra
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 7:56 AM IST

Updated : Mar 17, 2024, 10:54 PM IST

मुंबई INDIA Alliance Rally in Mumbai : मागील ६ महिन्यांपासून एकही बैठक न झालेल्या 'इंडिया' आघाडीला अखेर बैठकीसाठी मुहूर्त मिळाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' मुंबईत शनिवारी दाखल झाली होती. या यात्रेची सांगता सभा रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर झाली. या सभेपूर्वी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यानंतर हे सर्व नेते भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेत सहभागी झाले. या सभेत इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल केलाय.

तेजस्वी यादव यांचं भाषण : राहुल गांधी यांना धन्यवाद देतोय. संपूर्ण देशात त्यांनी यात्रा काढली. एका बाजूला नफरत पसरवली जातेय. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारांना केंद्रीय एजन्सीमार्फत पाडली जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी नफरत संपविण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून काम केले. लोकांना घाबरवले जातेय, विकत घेतले जाते. मोदींना हरविण्याचे नाही तर त्यांच्या विचारधारा हरविण्याचे काम करायचे. ज्यांनी आपल्या कार्यलयावर तिरंगा फडकवला नाही ते सांगतात आम्ही खरे देशभक्त आहोत. मोदी जे करतील त्याची चर्चा होते. मात्र, लोकांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत.गोदी मीडिया शांत राहते, मोदींविरोधात लढायला लालू यादव तयार आहेत.

प्रेमाचं दुकान उघडलंय : तेजस्वी यादव म्हणाले, "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रेमाचं दुकान उघडलंय. त्यांची दुकान बंद पडू देऊ नका. भाजपवाल्यांनी देशात द्वेष पसरवला आहे. त्यामुळे आपल्याला लोकांमध्ये राहायचे आहे. कायम राहुल गांधी आणि आमचा झेंडा बुलंद करा. डॉक्टरांनी लालूजींना फिरण्यास मनाई केली आहे. आज इथे लालू आले नाहीत. मात्र, मोदींवर औषध तयार करण्यास आज देखील ते सज्ज आहेत. आम्ही खरेपणा असलेले लोक आहोत. त्यामुळे आम्ही भीत नाहीत. लढत राहणार आहोत."

एम. के स्टॅलिन यांचं भाषण : काश्मीर ते कन्याकुमारी तसेच मणिपूर ते मुंबई हा भारत आहे. भारताला वाचवायचे आहे. सर्वधर्माचे लोक भारतीय आहेत. EVM मशीन चोर आहे. मत दिल्यानंतर आपलं मत चेक करा. इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर EVM पासून मुक्ती करू, निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य करू.

आप नेते सौरभ भारद्वाज यांचं भाषण : निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळं आता आम्ही सर्व सोबत आहोत. तरुंगात जाण्यासाठी आम्ही घाबरत नाहीत. लढेंगे, जितेंगे असा आता आमचा नारा आहे. आपल्या देशाचा जीव EVM मध्ये आहे. EVN हरविण्यासाठी जास्त मतदान झाले पाहिजे.

हेही वाचा-

  1. Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, म्हणाले, "अदानीच्या मागे..."
  2. Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'त प्रियंका गांधी झाल्या सहभागी; कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले स्वागत
  3. Rahul Gandhi : इलोक्टोरल बाँड हे पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट- राहुल गांधी

Last Updated : Mar 17, 2024, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.