ETV Bharat / state

कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी जवळ बेस्ट बस अपघातात एकाचा मृत्यू

मुंबईत आता पुन्हा एकदा बेस्ट बसचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. सीएसटीएम परिसरात बसनं एका व्यक्तीला चिरडलं.

Bus Accident
बस अपघात (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जवळील रस्त्यावर बेस्ट बसच्या चाकाखाली आल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. बेस्ट बसच्या चाकाखाली आल्यानं जखमी झालेल्या या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

वालचंद हिराचंद मार्गावर घडला अपघात : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ वालचंद हिराचंद मार्गावर हा अपघात घडला. ही बस कंत्राटी पध्दतीनं भाडेतत्वावर बेस्टच्या सेवेत आहे. मात्र, बस चालक कंत्राटी नसून बेस्टच्या नियमित सेवेतील आहे. ए-26 या मार्गावर देवनार डेपोची एमएच 03 ईसी 0174 क्रमांकाची ही बस होती. ही बस अणुशक्ती नगर इथून इलेक्ट्रिक हाऊस या मार्गावर चालवली जात होती. ज्ञानदेव जगदाळे असं बस चालकाचं नाव असून मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण : कुर्ला येथे मंगळवारी रात्री भरधाव बेस्ट बसने चिरडल्यानं तब्बल सात जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. ही घटना ताजी असतानाच हा अपघात झाल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या अपघात प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगावमध्ये पार्क केलेल्या दुचाकीला धडक : गोरेगाव येथे देखील बेस्ट बसनं एका दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार घडला. मात्र सुदैवाने ती रस्त्याशेजारी पार्क केलेली दुचाकी असल्यानं कोणीही जखमी झाला नाही. बस मार्ग क्रमांक 447, गाडी क्रमांक 1854 ही गोरेगाव अप दिशेने जात होती. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गाई वासरू चौकाच्या जवळ पार्क केलेल्या दुचाकीला या बेस्ट बसची दुचाकीला धडक बसली.

हेही वाचा -

  1. कुर्ला बस अपघात; ब्रेक ऐवजी चालकानं अ‍ॅक्सिलेटर दाबला अन् गेला 7 जणांचा बळी ? ; कुर्ला बस अपघातात धक्कादायक खुलासे
  2. बेस्ट बस अपघात प्रकरण; आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता, चालकावर गुन्हा दाखल
  3. शून्य बस अपघात ते अपघातांची मालिका सुरूच, खासगीकरणामुळं अपघातांच्या घटनात वाढ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.