ETV Bharat / state

भारत व बेलारुस दोन देशांमधील मैत्री व व्यापार वाढवण्याला प्राधान्य, बेलारुसमधील संधीबाबत वाणिज्यदूत अलेक्झांड्रा मात्सुको यांचं सादरीकरण - India Belarus

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 10:30 PM IST

Belarus India Relation : भारत व बेलारुस या दोन देशांतील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी व या दोन्ही देशातील नागरिकांमध्ये अनेक बाबींमध्ये समन्वय साधण्यासाठी बेलारुसच्या मुंबईतील वाणिज्यदूत कार्यालयानं पुढाकार घेतलाय.

भारत व बेलारुस
भारत व बेलारुस (Social Media)

मुंबई Belarus India Relation : भारत व बेलारुस या दोन देशांतील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी व या दोन्ही देशातील नागरिकांमध्ये व्यापार, उद्योग, पर्यटन अशा विविध बाबींमध्ये समन्वय साधण्यासाठी बेलारुसच्या मुंबईतील वाणिज्यदूत कार्यालयानं पुढाकार घेतलाय. नुकत्याच एका कार्यक्रमात बेलारुसचे मुंबईतील वाणिज्यदूत अलेक्झांड्रा मात्सुको यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईतील उबदार वातावरणाप्रमाणे येथील माणसांमध्ये देखील मायेची स्नेहाची उब आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलंय.

संजय भिडे (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले अलेक्झांड्रा : डिसेंबर 2022 पासून मुंबईत कार्यरत असलेले अलेक्झांड्रा म्हणाले, "व्यापार, शिक्षण व इतर विविध क्षेत्रांमध्ये मुंबई अत्यंत चांगलं शहर आहे. आम्ही अत्यंत थंड वातावरणाच्या पार्श्वभूमीवरुन येतो, मुंबईतील उबदार वातावरणाप्रमाणं मुंबईतील माणसं देखील स्नेहानं भरलेली आहेत. मुंबईतील जनतेमध्ये अत्यंत मैत्रीचं वातावरण आहे." तसंच मैत्रीच्या माध्यमातून व्यापाराला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ऑ़डिओ व्हिडिओ सादरीकरण केलं व बेलारुसमधील विविध संधी याबाबत माहिती दिली. त्यांनी दोन्ही देशातील संबंध वाढवण्यावर भर देण्याचा विचारही व्यक्त केला. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री व बेलारुसचे मुंबईतील वाणिज्यदूत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होण्याची गरज : यावेळी टीएसीसीआयचे संस्थापक अध्यक्ष संजय भिडे यांनीही या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. बेलारुसबाबत देशात पूर्वी जास्त माहिती नव्हती. हा देश पूर्वी सोव्हिएट रशियाचा भाग होता. नंतर तो स्वतंत्र झाला. दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योग क्षेत्रात वाढते व्यवहार व्हावेत या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बेलारुस व भारतातील नागरिकांमध्ये संपर्क, सहकार्य वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्या दिल्ली येथून बेलारुसला जाण्यासाठी विमान सेवा उपलब्ध आहे. व्यापार वाढल्यावर मुंबईतून बेलारुस जाण्यासाठी विमान सेवा उपलब्ध होईल. दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये मैत्री वाढल्यावर व्यापार-उद्योग साहजिकपणे वाढतील, असा विश्वास भिडे यांनी व्यक्त केला. तसंच भिडे यांनी बेलारुस व भारताचे संबंध अधिक दृढ होण्याची गरज व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. ''मोदींचा पराभव व्हावा ही प्रत्येक पाकिस्तानीची इच्छा...''; पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी राहुल गांधींबाबत काय म्हटलं? - Lok Sabha Elections 2024
  2. निवृत्त भारतीय सैन्यदल अधिकारी वैभव काळे यांचा 'हमास'च्या हल्ल्यात मुत्यू, कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर - Vaibhav Kale dies in Hamas attack
  3. हमासनं इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, कोणतीही जीवितहानी नाही - Israel Hamas War

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.