ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी - लोकसभा निवडणूक

Senior Police Officers Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बुधवारी (31 जानेवारी) रात्री या संदर्भात आदेश काढण्यात आले.

Senior Police Officers Transfers
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 6:59 AM IST

मुंबई Senior Police Officers Transfers : लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 58 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. त्यापैकी एकोणीस अधिकारी पदोन्नतीवर आहेत. तर इतर बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान,राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बुधवारी (31 जानेवारी) रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

असे आहेत फेरबदल : नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणारे अमितेश कुमार हे आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. तर त्यांच्या जागी महामार्ग वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंघल यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तसंच पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन होमगार्डचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

संदीप पाटील यांना पदोन्नती : ठाणे पोलीस सहआयुक्त दत्ता कराळे यांची नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना पदोन्नती देऊन नक्षलविरोधी कारवायांसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई पोलिस उपायुक्त अजय यांची जालना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयच्या क्लीन चिट आणि क्लोजर अहवालानंतर, मुंबई पोलिसांचे माजी पोलीस आयुक्त पराग मणेरे यांची ठाणे शहर पोलिसात नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस वाहतूक प्रमुख प्रवीण पडवळ यांची आयजीपी प्रशिक्षण आणि विशेष ऑपरेशन्स म्हणून डीजी कार्यालयात बदली करण्यात आली असून एटीएसचे आयजीपी अनिल कुंभारे यांची वाहतूक पोलीस सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांची संभाजी नगर परिक्षेत्राचे आयजीपी म्हणून पदोन्नती आणि नियुक्ती करण्यात आली. तर पुणे पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना राज्य आर्थिक गुन्हे शाखेचे आयजीपी म्हणून पदोन्नती देण्यात आली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी बढती देऊन मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत पाठवण्यात आले आहे. तर मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांना पदोन्नती देऊन अतिरिक्त आयुक्त पुणे पोलिस आणि मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त महेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेड्डी यांची एसपी जळगाव येथे बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी ओळखी असल्याचं सांगून महिलेची लाखो रुपयांनी फसवणूक, आरोपीला सुरतमधून अटक
  2. गुन्हे शाखेची कारवाई; 31 ग्रॅम कोकेनसह नायजेरीयन आरोपीस अटक
  3. Pune Crime : दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफावर गोळीबार, कोट्यवधीचं सोनं लुटलं!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.