पुणे Gramsevak Bribe : बारामती इथं 2017 साली एका लोकसेवकानं पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करून देसाठी 10 हदार रुपयांची लाच मागणी करुन ती स्विकारल्याबाबत पुणे विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत आता तब्बल 6 वर्षानंतर न्यायालयानं निकाल दिला असून, यातील आरोपी लोकसेवकाला 5 वर्षांची शिक्षा तसंच 25 हजार रु दंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. दिपाली जगन्नाथ कुतवळ (37) असं शिक्षा सुनावलेल्या ग्रामसेवकांच नाव आहे. याबाबत आज बारामती येथील सत्र न्यायालयानं निर्णय दिला आहे.
10 हजारांची केली होती लाचेची मागणी : याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी दिपाली कुतवळ या बारामती पंचायत समिती इथं ग्रामसेवक म्हणून कार्यरत होत्या. यदरम्यान 2017 साली पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करुन देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणी करुन ती स्विकारल्याबाबत पुणे विभागाकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्चना दौडकर यांनी तपास करुन अतिरिका सत्र न्यायाधीश बारामती न्यायालय इथं आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केलं होतं.
न्यायालयानं सहा वर्षांनंतर सुनावली शिक्षा : या खटल्याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बारामती कोर्ट न्यायालयात सुनावणी होवून दाखल गुन्ह्यामध्ये लोकसेवकाविरद्ध आरोप सिद्ध झाल्यानं त्या ग्रामसेवकाला 5 वर्ष शिक्षा व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा व तसंच दंड न भरल्यास वाढीव 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलीय. न्यायालयानं दिलेल्या या आदेशानं लाच स्विकारणांऱ्यांना काही प्रमाणात दणका बसल्याचं बोललं जात असलं तरी, दिवसेंदिवस लाच घेण्याचं प्रमाण मात्र वाढतंच आहे.
हेही वाचा :
- जेवणाच्या वादातून सहकाऱ्यावर कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला; हल्लेखोर सहकाऱ्याला अटक - Thane crime
- पोक्सो गुन्ह्यात 10 वर्षाची शिक्षा झालेल्याच्या शिक्षेला स्थगिती, आरोपीला मिळाला जामीन - POCSO crime quashed
- काय सांगता ! सीबीआयच्या डीएसपीचे २ लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटले, फसवणुकीची तऱ्हा 'कशी' ठरली निराळी - cyber fraud