ETV Bharat / state

"बदलापूर प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती-देवेंद्र फडणवीस यांची माहिती - badlapur school girls case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 6:18 PM IST

Updated : Aug 20, 2024, 7:36 PM IST

दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत अत्याचार झाल्यानंतर बदलापूरमध्ये मोठे पडसाद उमटले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीकरिता गेल्या दहा तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू आहे. दुसरीकडं गृहमंत्री यांनी तातडीनं कारवाईचे आदेश दिले आहेत. बदलापूर घटनेबाबतचे सर्व अपडेट जाणून घ्या.

badlapur school girls case updates
बदलापूर घटनेवर देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat Reporter)

मुंबई - बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर जनतेचा उद्रेक समोर आला आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर राजकारणीसुद्धा लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या घटनेनंतर गृह विभागावर टीका केली आहे. या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Live updates

  • बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीनं तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
  • बदलापूर आंदोलन आता चिघळले आहे. पोलिसांकडून आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला आहे.

तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल- देवेंद्र फडणवीस म्हणाले," बदलापूरची घटना ही अतिशय दुर्दैवी पद्धतीची आहे. शाळेतील दोन अतिशय लहान मुलींवर तिथे सफाई कर्मचाऱ्यानं अत्याचार केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तत्काळ यासंदर्भात आयजी दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांची नियुक्त केली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी, अशा प्रकारची भावना या नियुक्तीमागे आहे. तसेच या घटनेनंतर प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत तातडीनं कारवाई केली जात आहे. यासंदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल. अशा प्रकारचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. फास्टट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्तावदेखील मागवण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकार आणि पोलीस विभागाचा आहे. त्या दृष्टीने अतिशय वेगानं कारवाई करायला सुरुवात झाली आहे."

मला या गोष्टीचं दुर्दैव वाटतं की, विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येसुद्धा केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. संवेदना बोथट झालेला विरोधी पक्ष आहे. या प्रकरणात आपणाला न्याय कशा पद्धतीने मिळवून देता येईल, अशा पद्धतीने वागायचं असतं. तशा सूचना करायच्या असतात. परंतु त्यांना जनतेशी काही देण-घेणं नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

जनतेच्या भावनांचा उद्रेक- या घटनेचा तीव्र निषेध करत हजारो कार्यकर्ते बदलापूर रेल्वे स्थानकात जमा झालेले आहेत. याबाबत बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले, " हा जमाव आलेला स्वयंस्फूर्त आहे की कसे? यावर कमेंट करणं आता योग्य नाही. जनतेच्या भावनांचा उद्रेक असू शकतो. हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळताना कुठलाही पद्धतीचा दंगा होऊ नये, याकडेही लक्ष देणं गरजेचे आहे."

पीडित कुटुंबाला न्याय- "चिमुकलींवर अत्याचाराची घटना १३ ऑगस्ट रोजी झाली आहे. पण जेव्हा ही घटना निदर्शनास आली, तेव्हा यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तरीही यामध्ये काही लपवाछपवी झाली आहे का? कोणी जाणीवपूर्वक उशीर केला आहे का? या संदर्भात एसआयटी चौकशी करेल. पीडित कुटुंबाला न्याय कसा देता येईल? तसेच कायदा आणि सुव्यवस्था राज्यात कशा पद्धतीने राखता येईल, हे पाहणं महत्त्वाचं आहे," असे मत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

हेही वाचा-

  1. बदलापूर अत्याचार प्रकरण : विरोधकांचा संताप, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी, देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Minor Girl Sexual Assault Case
  2. बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिले 'एसआयटी' चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री म्हणाले, "दोषींना सोडणार नाही" - SIT Probe In Badlapur Rape Case
  3. बदलापूर अत्याचार घटनेची सरकारकडून गंभीर दखल; शाळा मुख्याध्यापिका निलंबित, कठोर कारवाईचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश - Badlapur Girls Sexually Assaulted

Last Updated : Aug 20, 2024, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.