ETV Bharat / state

लॉरेन्स गँगनं सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली? कथित पोस्टमध्ये दाऊदसह सलमान खानचाही उल्लेख

लॉरेन्स बिश्नोई गँगनं राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. याच गँगनं अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 26 minutes ago

Baba Siddique murder reason
लॉरेन्स गँगचे कनेक्शन बाबा सिद्दीकी खून प्रकरण (Source- IANS/ETV Bharat Repoter)

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाबाबत महत्त्वाचे अपडेट आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं जबाबदारी स्वीकारणारी कथित पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्यानं बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचं सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बिश्नोई गँगची पोस्ट? : बिश्नोई गँगनं केलेल्या कथित पोस्टमध्ये अभिनेता सलमान खानचाही उल्लेख आहे. दाऊद इब्राहीमला बॉलीवुड, राजकारण आणि प्रॉपर्टी डिलिंगशी बाबा सिद्दीकी यांनी जोडल्याचा दावा करण्यात आला. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल, असा इशारादेखील पोस्टमध्ये देण्यात आला आहे. एखाद्याचा जीव जाणे म्हणजे काय, हे आता तुम्हाला कळत असेल, असेही पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, "आम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट पाहिली आहे. आम्ही त्याची सत्यता पडताळत आहोत."

Baba Siddique murder
सोशल मीडिया पोस्ट (Source : Social Media)

दिल्ली पोलिसांसह मुंबई पोलीस करणार तपास : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप सूत्रांच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. या टोळीचा सिद्दीकी यांच्या हत्येत काय सहभाग आहे? याचा मुंबई पोलीस तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे एक पथकदेखील मुंबईत आज तपासासाठी दाखल होणार आहे.

कुठे भेटले आरोपी? : बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या चालवणारे आरोपी हे पंजाबमधील एका तुरुंगात एकत्र होते. यावेळी त्यांची बिश्नोई गॅंगमधील एका शार्प शूटरशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी बिश्नोई गॅंगमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. सलमान खान याचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा सिद्दिकी यांचा काटा काढण्यासाठी या तिघांना अडीच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांनी गेल्या एक महिन्यापासून रेकी केली होती. बाबा सिद्दिकी यांना मारल्यानंतर त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

महिनाभर आरोपींनी ठेवली होती पाळत : बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन जणांनी शनिवारी रात्री गोळीबार केला होता. यापैकी गुरमेल बलजीत सिंग (23, रा. हरियाणा) आणि धर्मराज कश्यप (19, रा. उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी फरार आहे. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार अटकेतील दोन्ही संशयितांनी सुमारे महिनाभर पाळत ठेवली होती. तिन्ही आरोपी रिक्षात बसून तेथे पोहोचले होते. लॉरेन्स बिश्नोईवर 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो गुजरात तुरुंगात बंद आहे.

काय आहे बाबा सिद्दीकी आणि लॉरेन्स कनेक्शन? : बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवुड अभिनेता सलमान खानसोबत जवळचे संबंध होते. विशेष म्हणजे सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि त्याच्या साथीदारांकडून वारंवार धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्सच्या टोळीतील गुंडांनी 14 एप्रिल 2024 रोजी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांशी संबंध असल्याचं मुंबई पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं होतं.

Disclaimer : 'ईटीव्ही भारत' लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सोशल मीडियातील कथित पोस्टबाबत किंवा पोस्टच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.

हेही वाचा-

  1. बाबा सिद्दीकींच्या मृत्यूची केआरकेनं उडवली खिल्ली? नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर
  2. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार दफन विधी; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Last Updated : 26 minutes ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.