ETV Bharat / state

IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ऑडी कार दुसऱ्याच्या नावावर; चौकशीसाठी समिती स्थापन - IAS Pooja Khedkar

IAS Pooja Khedkar : ऑडी कारवर लाल दिवा लावणाऱ्या तसंच सरकारी सुविधांची मागणी करणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरांबाबत धक्कादायक माहिती सातत्यानं समोर येत आहे. अपंग प्रमाणपत्र दाखवून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप होत आहे. तसंच त्यांची 17 कोटी रुपयांची संपत्ती असूनही नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेतल्याचं बोललं जात आहे.

IAS Pooja Khedkar
पूजा खेडकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 5:04 PM IST

Updated : Jul 12, 2024, 6:47 PM IST

पुणे IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांच्याबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यांच्यावरील संकट काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी वापरेलेली ऑडी कार वादाच्या भोऱ्यास सापडली आहे. त्यांची ऑडी कार थर्मोवेरिटा इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड (ThermoVerita Engineering Pvt Ltd) कंपनीची असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीत पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर संचालक होत्या. तसंच याच कंपनीशी सबंधित 'डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट्स' प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काही काळ पूजा खेडकर देखील संचालक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसं मिळालं? : "पूजा यांनी ज्या ऑडी कारवर 'महाराष्ट्र शासन' तसेच लाल दिवा लावला होता ती कार थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे. पूजाच्या आई मनोरमा खेडकर या वरील कंपनीच्या माजी डायरेक्टर आहेत. तसंच डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पूजा या देखील डायरेक्टर होत्या. डायरेक्टर असताना पूजा यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसं मिळालं? याची सरकारनं चौकशी करावी. तसंच त्यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली.

ऑडी कारवर 21 चलन : पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर 21 चलन आहेत. तसंच खेडकर यांच्या गाडीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांनी कारवर लाल दिवा लावला होता. तसंच त्यांनी कारवर महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं. 2022 पासून आतापर्यंत त्यांच्या कारवर वाहतुकीचे नियम मोडणे, अतिवेगानं वाहन चालवणं, सिग्नल तोडणे असे 21 चलन प्रलंबित आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच ऑडी कारची नोंदणी खासगी इंजिनिअरिंग कंपनीच्या नावावर आहे, अशी माहिती समोर येत आहे.

चौकशीसाठी समिती स्थापन : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी केंद्रानं गुरुवारी (11 जुलै) एक सदस्यीय समिती स्थापन केली. पूजा खेडकर यांनी IAS पद मिळवण्यासाठी अपंगत्व, तसंच OBC आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. केंद्रानं एका निवेदनात म्हटलं आहे की, हा तपास अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केला जाईल. 2023 च्या बॅचचे अधिकारी खेडकर यांच्या उमेदवारीसह इतर तपशीलांची पडताळणी करतील. ही समिती दोन आठवड्यात अहवाल सादर करणार आहे.

शेतकऱ्यांना धमकी : पूजा खेडकर यांच्या आईचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकी देत आहेत. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याची मागणीही राजकीय वर्तुळात जोर धरू लागली. पूजा यांचे वडील सेवानिवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केल्याचा आरोप केला जात आहे. याशिवाय त्यांच्याकडं पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यासह अनेक ठिकाणी जमीन आहे, असा दावाही केला जात आहे.

हे वाचलंत का :

  1. आयएएस पूजा खेडकरांच्या आईची पिस्तूल घेऊन दमदाटी, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दिलं स्पष्टीकरण - IAS Pooja Khedkar
  2. पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा ; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला सोडवण्यासाठी पोलीस उपायुक्तांवर टाकला दबाव - Pooja Khedkar Tried To Pressure DCP
  3. दिव्यांग असल्याचं सांगून पूजा खेडकर झाल्या IAS? खेडकर आहेत 17 कोटींची संपत्तीच्या मालकीण - IAS Officer Pooja Khedkar

Last Updated : Jul 12, 2024, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.