ETV Bharat / state

हल्ला झालेल्या 'त्या' युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; बारामतीत खळबळ - Baramati Crime News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 8:17 PM IST

Baramati Crime News : बारामतीमधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. हॉटेलात चायनीज पार्सल आणण्यासाठी गेलेल्या युवकावर जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या हल्लात अनिकेत शंकर धोत्रे (Aniket Shankar Dhotre) हा गंभीर जखमी झाला होता. आज रविवारी (दि. 24) पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

Baramati Crime News
युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती Baramati Crime News : चायनीज हाॅटेलात पार्सल आणण्यासाठी गेलेल्या युवकावर जुन्या भांडणाच्या कारणावरून लाठ्याकाठ्या, लोखंडी राॅडने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिकेत शंकर धोत्रे (Aniket Shankar Dhotre) या युवकाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : अमोल उर्फ भोरया धोंडीराम पवार, हनुमंत दिलीप धोत्रे, नवनाथ महादेव धोत्रे (रा. कोअर हाऊस, आमराई, बारामती), विनोद रोहिदास धोत्रे, सुमित उर्फ भैय्या विलास धोत्रे (रा. रमाईमाता भवन, आमराई) आणि सागर पवार (रा. मुंबई) यांच्यावर अनिकेतवर हल्ला केल्याप्रकरणी यापूर्वीच शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आता खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

काय होती घटना? : दि. 17 मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली होती. अनिकेत आणि त्याचा मित्र रितेश मोहन देवकर (रा. चंद्रमणीनगर, बारामती) हे दोघे चायनीज आणण्यासाठी बालक मंदिराच्या पाठीमागील श्री चायनीज हाॅटेलात गेले होते. यावेळी पाच ते सहा अनोळखी युवकांनी तेथे येत अनिकेत याला मारहाण केली होती. हाॅटेलातील सीसीटीव्ही फूटेज पाहिले असता त्यात हे युवक लाकडी दांडके, लोखंडी राॅडने अनिकेतला मारहाण करताना दिसून आले. मारहाणीमुळं अनिकेता हा बाहेर पळाला असता त्यांनी त्याला गाठत पुन्हा मारहाण केली होती. रितेश हा भांडणे सोडवताना दिसून आला. बेशुद्धावस्थेतील अनिकेत याला बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर मारहाण झालेल्या अनिकेत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा -

  1. Shivani Wadettiwar : शिवानी वडेट्टीवार यांना घरचा आहेर; पार्सल उमेदवार नको, स्थानिक हवा; महाविकास आघाडीच्या बैठकीत एकमुखाने निर्णय
  2. Tomato Parcel to Suniel Shetty : सुनील शेट्टींच्या वक्तव्याचा निषेध, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्क टोमॅटो पाठवले पार्सल !
  3. नागपुरात नितीन गडकरींविरोधात ठाकरे काँग्रेसचा 'विकास' करणार का? - Nagpur Lok Sabha Constituency

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.