ETV Bharat / state

भाजपा उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला; धामणगाव मतदारसंघात खळबळ

धामणगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोटे आणि त्यांच्या वाहनावर सातेफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे.

Archana Rote
अर्चना रोटे आणि वाहनावर हल्ला (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 2 hours ago

अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता बुधवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या आहेत. त्यामुळं आता येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. तर दुसरीकडं प्रताप अडसड यांच्या बहिणीवर सोमवारी हल्ला झाल्याचा आरोप आहे. अर्चना रोटे यांच्या हातावर चाकूने वार देखील करण्यात आल्याचा आरोप आहे. सातेफळ फाटानजीक हा हल्ला झाल्याची माहिती कळताच धामणगाव रेल्वे मतदारसंघात खळबळ उडाली. सातेफळ येथील भाजपा कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अर्चना रोटे यांना चांदुर रेल्वे येथील डॉक्टर ढोले यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्या हातावर गंभीर जखम झाली असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीत हलवण्यात आल्याची माहिती प्रताप अडसड यांनी दिली.

प्रताप अडसड यांचं कार्यकर्त्यांना आवाहन : "या घटनेमुळं कार्यकर्त्यांनी घाबरू नये किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये. प्रत्येकानं आपलं गाव सोडून इतर कुठेही जाऊ नये. हा संपूर्ण प्रकार आपण गोंधळ घालावा यासाठी विरोधकांनी रचलेला कट असू शकतो," अशी शंका प्रताप अडसड यांनी व्यक्त केली. "सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावातच शांत राहावं आणि निवडणुकीच्या दिवशी आपल्या मतदारांना बाहेर काढावं," असं आवाहन देखील प्रताप अडसड यांनी केलं.

माहिती देताना प्रताप अडसड (Pratap Adsad)

हल्लेखोर अज्ञात : अर्चना रोटे यांच्या वाहनावर दगडफेक करणारे आणि त्यांच्या हातावर चाकून वार करणारे हल्लेखोर हे अज्ञात असून, या घटनेनंतर हल्लेखोरांनी रात्रीच्या अंधारात पळ काढला. चांदुर रेल्वे पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रचार तोफा थंडावल्या : विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा सोमवारी थंडावल्या. त्याआधी सर्वच नेत्यांनी आपआपल्या मतदासंघात जोरदार प्रचार केला. दरम्यान, प्रचार संपताच हा हल्ला झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची शेवटची पत्रकार परिषद; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
  2. "बारामतीचं नाव घेतलं की, लोक आणखी एक नाव घेतात ते म्हणजे..."; पाहा काय म्हणाले शरद पवार
  3. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध उद्धव सेनेमध्ये होणार चुरशीची लढत

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.