ETV Bharat / state

लोकसभा निकालानंतर खदखद बाहेर; पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, विखे-लंके कार्यकर्ते भिडले - Rahul Zaware Car Attack

Rahul Zaware Car Attack : लोकसभेच्या निकालानंतर निलेश लंके (Nilesh Lanke) आणि सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे (Rahul Zaware) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 3:57 PM IST

Updated : Jun 6, 2024, 4:27 PM IST

Rahul Zaware
राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला (ETV BHARAT MH DESK)

अहमदनगर Rahul Zaware Car Attack : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यात चुरशीची लढत झाली होती. प्रचाराच्या काळातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमकपणे एकमेकांवर टीका करीत होते. सोशल मीडियातून वाद होत होते. आता निकालानंतर ही खदखद बाहेर पडण्यास सुरूवात झालीय.

लंके समर्थकांवर प्राणघातक हल्ला (ETV BHARAT MH DESK)

राहुल झावरे यांच्यावर उपचार : पारनेर तालुक्यात गुरूवारी दुपारी दोन ठिकाणी लंके आणि विखे समर्थकांमध्ये राडा झाला. पारनेर बसस्थानकाजवळ खासदार लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचीही तोडफोड केली. यामध्ये जखमी झालेल्या झावरे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तालुक्यात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

गाडी अडवून केला हल्ला : गुरूवारी दुपारी ही घटना घडली याची सुरूवात गोरेगाव येथून झाल्याचं सांगण्यात येतं. पहिली घटना गोरगाव येथे घडली. सोशल मीडियातील वाद यामागील कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पारनेर शहरात बसस्थानकाजवळची घटना घडली. तेथे राहुल झावरे आपल्या वाहनातून जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. झावरे यांनाही मारहाण झाली. त्यात झावरे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनेची नेमकी माहिती घेण्यात येत आहे. त्याचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. झावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खासदार लंके समर्थकांनी निषेध केलाय.

प्रचार काळातही वाद : या निवडणुकीत पारनेर तालुक्यात दोघाही उमेदवारांच्या समर्थकांनी टोकाचा विरोध करत प्रचार केला. प्रचार काळातही छोटेमोठे वाद झाले होते. निकालानंतरही सोशल मीडियातील पोस्टवरून वादाचा भडका उडताना दिसून येत आहे.

हेही वाचा -

  1. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का, नीलेश लंकेंचा विजय, विखेंचा पराभव - Ahmednagar Election 2024 Result
  2. महाराष्ट्राच्या 13 आमदारांनी आजमावलं लोकसभेत नशीब; तब्बल सात आमदारांना लागली खासदाराची लॉटरी - MLA Won In Lok Sabha Election Result 2024
  3. विकासाचे महामेरू नितीन गडकरी; महामार्ग, उड्डाणपूल, खडेबोल: काय आहे नागपूरचा गड राखणाऱ्या गडकरींच्या विजयाचं गमक - Nagpur Lok Sabha Result 2024

Last Updated : Jun 6, 2024, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.