ETV Bharat / state

वनविभागाकडून आदिवासींवर अत्याचार? महामार्गालगतच्या जमिनीत व्यवसाय करू देण्यास विरोध - आदिवासींवर अत्याचार

Atrocities On Tribals : पालघर तालुक्यातील कुडे येथील टोकरे कुटुंबीय महामार्गालगतच्या स्वत:च्या जमिनीत रोपवाटिकेचा व्यवसाय करतात. (Tokare family agony) मात्र, मागील काही दिवसांपासून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्रास देत, येथे व्यवसाय करायचा नाही असा दम भरला आहे. गावातील काही धनदांडगांच्या इशाऱ्यावरून वनविभाग हा प्रकार करत असल्याचं टोकरे या आदिवासी कुटुंबाचं म्हणणं आहे. (no permission to do business)

Atrocities On Tribals
टोकरे कुटुंब
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 10:44 PM IST

वनविभागाकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सांगताना पीडित रमेश टोकरे

पालघर Atrocities On Tribals : पालघर तालुक्यातील कुडे येथील रमेश कृष्णा टोकरे आणि अजय दुंदाजी टोकरे हे त्यांच्या स्वतःच्या जमिनीत रोपवाटिकेचा व्यवसाय करत असतानाही गावातील काही धनदांडग्या लोकांच्या इशाऱ्यानुसार वनविभाग काम करीत आहे. (trouble from forest department) ही जमीन बळकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप टोकरे यांनी केला आहे. कुटुंबीयांना रोपवाटिकेचा व्यवसाय करू देण्यास प्रतिबंध केला जात आहे. त्यामुळे आता हे कुटुंब जेरीस आले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या छळाच्या विरोधात आत्महत्या करण्याचा इशारा या कुटुंबानं दिला आहे.

हा तर कुटील प्रयत्न : रमेश टोकरे आणि अजय टोकरे हे कुडे येथे राहतात. त्यांच्या नावावर सर्वे नंबर १२२/५३ चा उतारा आहे. त्यांची ती जमीन वडिलोपार्जित आहे. ही जमीन राष्ट्रीय महामार्गालगत असल्यानं या जमिनीला कोट्यवधी रुपयांचा भाव आहे. या जमिनीवर गावातील काही धनदांडग्या पुढाऱ्यांचा डोळा आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न चालवला आहे.

धनदांडग्यांचा जमिनी बळकावण्याचा प्रयत्न : या जमिनीत टोकरे कुटुंबीय रोपवाटिका चालवीत असून रोपांच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो; परंतु ही जमीन अनेकांच्या नजरेत असल्यानं या जमिनीत त्यांनी काहीच करू नये आणि ही जमीन बळकवावी असा काहींचा प्रयत्न आहे. त्यासाठी कुडे येतील वनविभागाचे अधिकारी त्यांना बोलावून घेऊन या जमिनीतील रोपे उचलून घेऊन जा, येथे काहीच करायचे नाही असे सांगून त्रास देत आहेत.

अधिकारी धनदांडग्यांच्या हातचे बाहुले: आदिवासी असूनही तसेच जमिनीचा उतारा टोकरे यांच्या नावावर असूनही त्यांचं उपजीविकेचं साधनच हिरावून घेण्याचा प्रयत्न अधिकारी करीत आहेत. ते गावातील धनदांडग्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत, असा आरोप टोकरे कुटुंबीयांनी केला. पोलिसांना बोलावून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे. या सगळ्यामुळं टोकरे कुटुंबीयांची मनस्थिती बिघडली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा हा त्रास थांबला नाही, तर आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आता पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'टोकरे कुटुंबांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाबाबत माझ्याकडे अजून तक्रार आलेली नाही. माझ्याकडे कागदपत्रांसह तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून चौकशीचे आदेश देईन.'- विवेक पंडित, अध्यक्ष, आदिवासी विकास आढावा समिती (राज्यमंत्री दर्जा)

'टोकरे यांच्याकडे कागदपत्रे आहेत. त्यांच्याकडे सात-बारा आहे; परंतु त्यांची जागा नेमकी कोठे आहे. याचा उल्लेख नाही. १२२/५३ सर्वे क्रमांकातील १२२/४० पर्यंत उल्लेख आहे; पुढच्या गटांचा उल्लेख नाही. भूमी अभिलेख विभागाकडून त्याची मोजणी करायला हवी. वनपाल आणि संबंधित शेतकरी या दोघांनाही बोलवून त्यांची चौकशी करू. विभागाचे कुणी अधिकारी त्रास देत असतील, तर त्यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना देऊ.' -- ऋषिकेश वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी (दहिसर)

हेही वाचा:

  1. नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई, दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक
  2. पुण्यात मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाला तुफान गर्दी, आरक्षणासाठी जरांगे यांची मुंबईकडं कूच
  3. मनोज जरांगे मनुवादी, त्यांचं आंदोलन फडणवीस आणि आरएसएसने प्रभावित; पद्मश्री लेखक लक्ष्मण माने यांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.