ETV Bharat / state

मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांनी डावलले सभागृहाचे आदेश; अध्यक्षांनी उगारला कारवाईचा 'बडगा' - Maharashtra Mosoon Session 2024 - MAHARASHTRA MOSOON SESSION 2024

Maharashtra Mosoon Session 2024 : मुंबा देवी परिसरातील पार्किंगचं काम करण्यास सभागृहानं थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही हे काम करण्यात आल्यानं त्यावर आज सभागृहात मोठा गदारोळ झाला. सभागृहाचे आदेश डावलल्यानं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाईचे निर्देश दिले.

Maharashtra Mosoon Session 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 2:24 PM IST

मुंबई Maharashtra Mosoon Session 2024 : मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार यांचं संगनमत असल्यानं अनेक बेकायदा कामं मुंबईत होत आहेत, असा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केला. मुंबईचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबादेवीच्या विकास आराखड्यामध्ये पार्किंगची आवश्यकता नाही. त्यामुळे पार्किंग करण्यात येऊ नये, असे निर्देश गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते. मात्र असं असतानाही पालिकेचे काही अधिकारी आणि कंत्राटदार यांनी मिळून सदर काम सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे मुंबादेवी मंदिराची कमान झाकली जात असून त्याचं सौंदर्य नष्ट होत आहे. याबाबत संबंधितांना काम थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केली. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सभागृहाचे निर्देश डावलणाऱ्यांवर कारवाई करा : या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा निर्देश दिले की "सभागृहानं एकदा आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची पायमल्ली करण्याचं धाडस मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार कसं करू शकतात. स्टाक पार्किंगचं काम थांबवण्याचे निर्देश दिले असतानाही जर काम सुरू असेल, तर यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा अहवाल सादर करावा," असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले.

कारवाई करून अहवाल देणार - मुनगंटीवार : या संदर्भात उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, "ही बाब अत्यंत गंभीर असून यासंदर्भात संबंधित कंत्राटदार आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांना काम थांबवण्याचे आदेश देण्यात येतील. त्यांच्यावर कारवाई करून या संदर्भातील अहवाल आज अधिवेशन संपण्यापूर्वी देण्यात येईल."

हेही वाचा :

  1. "शरद पवारांनी आयुष्यभर..."; राहुल नार्वेकर यांची टीका - Lok Sabha Election 2024
  2. राहुल नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक, थेट राज्यपालांना पाठवला मेल; मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  3. विधानपरिषद निवडणूक 2024 : काँग्रेसची मतं फुटणार ही फक्त अफवा ; विजय वडेट्टीवार यांचा दावा - Maharashtra MLC Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.