ETV Bharat / state

हैदराबादचे अब्दुल चाचा करतात वारकऱ्यांची सेवा, 25 वर्षांपासून सेवा देण्यात त्यांना मिळतोय आनंद - Ashadhi wari 2024 - ASHADHI WARI 2024

Ashadhi wari 2024 : आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी देखील पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम हैदराबादचा एक मुस्लिम सेवेकरी करत आहे. तेही सर्व जाती धर्माच्या पलीकडं जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात. अब्दुल रज्जाक (चाचा) असं या मुस्लिम सेवेकरीचं नाव आहे.

Ashadhi wari 2024
सेवा करणारे अब्दुल रज्जाक (Etv Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 5:20 PM IST

पुणे Ashadhi wari 2024 : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पुण्यात रविवारी आगमन झालय. आज पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या मुक्कामाला आहेत. शहराच्या आजूबाजूला पुणेकर नागरिक तसंच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. असं असलं तरी पुण्यातील साखळीपीर तालीम येथे गेल्या 25 वर्षापासून अब्दुल रज्जाक (चाचा) हे वारकऱ्यांची सेवा करत आहे. विशेष म्हणजे अब्दुल रज्जाक (चाचा) हे हैदराबाद येथे राहायला असून ते पालखीच्या वेळेस पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. एवढंच नव्हे तर हे चाचा स्वतःहा तेल बनवतात आणि पुण्यात येऊन वारकऱ्यांची मालिश करतात.

माहिती देताना ईटीव्ही प्रतिनिधी (Etv Bharat Reporter)

पंचवीस वर्षांपासून करतात सेवा : पुण्यात अब्दुल रज्जाक हे वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळत आहे. अब्दुल रज्जाक हे जरी मूळचे हैदराबाद येथील असले तरी ते पुण्यात मुलींच्या येथे काही वर्ष राहायला होते. जडीबुटी पासून तेल तयार करून विविध आजारांवर औषधोपचार करण्याचा रज्जाक चाचा यांचा व्यवसाय आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून रज्जाक चाचा हे पुण्यात वारकऱ्यांची सेवा करत आहेत. 8 ते 10 वर्षापासून ते त्यांच्या मूळ गावी हैदराबाद येथील मलकपेठ येथे राहायला गेले आहेत. मात्र, असं असलं तरी ते पुण्यात पालखी आल्यावर पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात.

25 वर्षापासून मी सातत्यानं वारकऱ्यांची सेवा करत आहे. पुण्यात असताना मला साखळीपीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांना वारकऱ्यांची सेवा करायची आहे असं सांगितलं. तेव्हापासून मी आजपर्यंत वारकऱ्यांची सेवा करत आहे. दरवर्षी पालखीचं वेळापत्रक जाहीर झाल्यावर मी हैदराबादवरून पुण्यात येत असतो आणि वारकऱ्यांची सेवा करत असतो. वारकऱ्यांची सेवा करून मला खूपच आनंद मिळतो. आजपर्यंत अनेक संकटे आली पण या सेवेने सर्व संकटं दूर झाली. - अब्दुल रज्जाक, सेवेकरी

जातीपातीच्या पलीकडं जाऊन सेवा : यावेळी काही वारकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आम्ही अनेक वर्षापासून रज्जाक चाचांकडून मालिश करून घेतो. मालिश केल्यानं आम्हाला खूप बरं वाटतं. तसेच एक सामाजिक संदेश या माध्यमातून रज्जाक चाचा देतात. जातीच्या पलीकडं जाऊन चाचा वारकऱ्यांची सेवा करतात.

हेही वाचा -

  1. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन; पाहा नयनरम्य व्हिडिओ - Sant Tukaram Maharaj Palkhi
  2. Greetings Dindi For Palkhi: सर्व धर्मगुरुंच्या वतीने 'त्या' दोन पालख्यांसाठी अभिवादन दिंडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.