ETV Bharat / state

परवानगी द्या, शिवजयंतीपासून आम्ही शिवप्रेमी स्मारकाचं काम हाती घेऊ- विनोद पाटील यांची मागणी - Shivsmarak

Arabian Sea Chhatrapati Shivaji Memorial : अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच शिवस्मारकाबाबत आता शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. सरकारला जमत नसेल, तर जगभरातील शिवप्रेमी एकत्र येऊन शिवस्मारक उभारतील, असं आव्हान शिवप्रेमींच्या वतीनं देण्यात आलं आहे.

Shivsmarak
शिवस्मारक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 6:05 PM IST

Updated : Feb 16, 2024, 6:53 PM IST

मुंबई Arabian Sea Chhatrapati Shivaji Memorial : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच 'शिवस्मारक' उभारण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी या स्मारकाचं जलपूजन केलं होतं. मात्र, अजूनही स्मारकाचं काम होत नसल्यानं शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

शिवस्मारकाकडं दुर्लक्ष : " जलपूजनानंतर केवळ स्मारकाची चर्चा झाली. मात्र कामात काही प्रगती होत नसल्याचं दिसत आहे. त्यावर खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. स्मारकाचं जलपूजनच्या कार्यक्रमाला छत्रपतींच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर लाखो शिवप्रेमी शिवस्मारकाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, जलपूजनानंतर या स्मारकाच्या कामात दोन टक्केही प्रगती झालेली नाही. त्यामुळं राज्य सरकार शिवस्मारकाकडं दुर्लक्ष करत आहे, " आरोप मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.

, आता 2024 उजाडलं आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये या प्रकल्पाची साधी एक वीटही शासनाला रचता आलेली नाही. त्यामुळं देशभरातील शिवप्रेमी आता अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात आम्ही शासनाला वारंवार आठवण करून दिलीय. सातत्यानं पाठपुरावाही केलाय. मात्र, आजवरच्या सर्वच राज्य शासनांनी याकडं दुर्लक्ष केले- मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील

शक्य नसेल तर, आम्हाला परवानगी द्या : यावेळी विनोद पाटील यांनी सरकारला इशारा दिली. " शिवस्मारक बांधण्याची ताकद तुमच्यात नसेल, तर शिवस्मारक बांधण्यासाठी आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्या. आम्ही सर्व शिवप्रेमी स्मारकाचं हाती घेऊ. स्मारकासाठी महाराष्ट्रातील तसंच जगभरातील शिवप्रेमी पैसे गोळा करून भव्य शिवस्मारक उभारतील. आम्ही यापुढं राज्य सरकारकडं पाठपुरावा करणार नाही. आम्ही आता जगभरातील शिवप्रेमींना एकत्र करत आहोत. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीपासून 'शिवस्मारकाच्या' पवित्र कामाला सुरुवात करू," असा इशारा विनोद पाटील यांनी शिवप्रेमींच्या वतीनं राज्यसरकारला दिला आहे.

हे वाचलंत का :

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात! दहा वर्षांपूर्वी फक्त घोटाळ्यांची चर्चा, आता फक्त विकास
  2. बारामतीत 'नणंद विरुद्ध भावजय' लढत? सुनेत्रा पवारांचा प्रचाराचा रथही तयार, फक्त उमेदवारीची घोषणा बाकी
  3. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना

Last Updated : Feb 16, 2024, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.