ETV Bharat / state

'हा विजय जनतेचा' विजयानंतर अनिल देसाई यांची प्रतिक्रिया, राहुल शेवाळे यांचा पराभव - Lok Sabha Election Results 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 6:40 PM IST

Lok Sabha Election Results 2024 : मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. निवडणूक आयोगाने अनिल देसाई यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली असून देसाई यांनी हा जनतेचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

Lok Sabha Election Results 2024
अनिल देसाई (ETV Bharat Reporter)

मुंबई Lok Sabha Election Results 2024 : मुंबईतील 6 लोकसभा मदारसंघांपैकी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता या जागेचा निकाल हाती आला असून, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. निवडणूक आयोगानं अनिल देसाई यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली असून देसाई यांनी हा जनतेचा विजय असल्याचं म्हटलं आहे. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा 53 हजार मतांनी पराभव केला आहे.

अनिल देसाई यांची विजयावर प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

अनिल देसाई यांची शिवडी मतमोजणी केंद्राला भेट : विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर अनिल देसाई यांनी शिवडी येथे मतमोजणी केंद्राला भेट दिली. निवडणूक आयोगाने अनिल देसाई यांच्या विजयाची घोषणा करताच त्यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचं प्रमाणपत्र स्वीकारलं. त्यानंतर अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीच्या प्रचार काळात अनिल देसाई हे राहुल शेवाळे यांच्यासमोर कमकुवत उमेदवार असल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांना आता अनिल देसाई यांनी उत्तर दिलं आहे. देसाई म्हणाले की, मी पडद्यामागे काम करत आलो आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर संघटना बळकट करण्यासाठी ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांचं पालन मी आजही करत आहे. पडद्यामागे राहून जे काम करायचं असतं ते काम मी करत होतो."

उद्धव ठाकरेंच्या आदेशाचं पालन करतोय : पुढे बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे विजयी उमेदवार अनिल देसाई म्हणाले, "आमच्यासाठी मातोश्रीचा आदेश हा महत्त्वाचा असतो. आम्ही वेळोवेळी त्याचे पालन करत आलो आहोत. आता देखील मला उमेदवारीसाठी मातोश्री मधून उद्धव ठाकरे यांचे आदेश आले. त्या आदेशाचं मी पालन करतोय. हे सर्व मी पक्षासाठी करत होतो. माझ्या संघटनात्मक कार्यकाळापासून मी शिवसेना भवनात बसूनच काम करत आलो आहे. प्रचार काळात टेबलवर बसून काम होत नाही. त्यासाठी मैदानात जावं लागतं. अशा पद्धतीचा प्रचार माझ्या विरोधात करण्यात आला. आपल्या मनामध्ये जे विचार असतात, घरचे संस्कार असतात ते लोकांपर्यंत जात असतात. माझ्या विरोधात जे काय कोणी केलं असेल त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. मशाल पेटली! भाऊसाहेब वाघचौरेंना साईबाबा पावले; शिर्डीतून सदाशिव लोखंडेंचा पराभव - Shirdi Lok Sabha Results 2024
  2. मुंबईत शिंदे गटाला मोठा धक्का; दक्षिण-मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी - Lok Sabha election results 2024
  3. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - sharad pawar news

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.