मुंबई - Anant and Radhika wedding : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा अखेर ठरला असून येत्या 12 जुलैला हा विवाह सोहळा मुंबईत पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. या विवाह सोहळ्याचं प्री वेडिंग जामनगर येथे पार पडलं होतं. त्यानंतर आता या जोडप्याच्या लग्नाच्या तारखे विषयी उत्सुकता होती. येत्या 12 जुलैला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असून या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेचा पहिला फोटो समाज माध्यमांवर वायरल झाला आहे.
मार्च 2024 मध्ये जामनगर येथे अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात या जोडप्याच्या प्री-वेडिंगचा समारंभ करण्यात आला होता. या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या शाही पाहुण्यांसाठी सुद्धा अत्यंत महागडी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जामनगरच्या विमानतळालाही दहा दिवसांकरिता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला होता. या प्री-वेडिंगला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलावंतांची हजेरी होती, तर राजकारण आणि अर्थकारणातील अनेक बड्या असामी पहायला मिळाल्या होत्या. अगदी सलमान खान शाहरुख खानपासून ते हॉलिवुडमधील अनेक कलावंत यावेळी उपस्थित होते.
कसा असेल विवाह सोहळा?
अनंत आणि राधिका यांच्या दुसऱ्या प्री वेडिंगसाठी इटली येथे एक क्रूज बुक करण्यात आली आहे. या क्रूजवर दुसरे प्री-वेडिंग सध्या सुरू आहे. ही क्रूज इटली ते फ्रान्स दरम्यान प्रवास करणार आहे. यासाठी अनेक कलावंत पोहोचले आहेत. असे असतानाच आता या दोघांच्या विवाह सोहळ्याची तारीख आणि पत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. शुक्रवार 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे अनंत आणि राधिका यांचा लग्नविधी समारंभ पार पडणार आहे. 13 जुलै रोजी शनिवारी या जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम आणि विधी पार पडणार आहेत. तर रविवारी 14 जुलै रोजी या शाही विवाह सोहळ्याचा ग्रँड रिसेप्शन सोहळा असणार आहे. या लग्नाचे सर्व विधी हे मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू विवाह पद्धतीनं होणार आहेत.
हे असतील वऱ्हाडी?
या लग्नाला जगभरातील सर्व दिग्गज वऱ्हाडी म्हणून उपस्थित राहतील. यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय, शाहरुख खान सलमान खान, क्रिकेटपटू विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अनुष्का शर्मा, विकी कौशल, कतरीना कैफ यांच्यासह अनेक बॉलिवूडमधील कलावंत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट जगतातील लॅरी फिंक, स्टीफन श्वार्जमन, बॉब इगर, इवाका ट्रम्प, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार असून या विवाह सोहळ्यासाठी शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होणारा असून यात फुलांच्या सजावटी पासून डेकोरेशनच्या अन्य साहित्याचा तसेच पाहुण्यांच्या सुरक्षेपासून त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा -