ETV Bharat / state

अंबानीच्या विवाहाचा बीकेसीतील कर्मचाऱ्यांना फटका, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' - ANANT RADHIKA WEDDING - ANANT RADHIKA WEDDING

Anant Ambani Radhika Merchant Wedding : उद्योगपती मुकेश अंबानीचे पुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यानिमित्त बीकेसीतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे.

Anant Ambani Radhik Merchant Wedding
अंबानी कुटुंब (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 10:01 PM IST

मुंबई Anant Ambani Radhika Merchant Wedding : उद्योगपती मुकेश अंबानीचे पुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याचं कवित्व काही संपता संपत नाही. मुंबईतील बिझनेस हब समजल्या जाणाऱ्या वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ सेंटरमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान या सोहळ्यातील विविध कार्यक्रम रंगत आहेत. त्यामुळं वांद्रे कुर्ला संकुलातील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मात्र या सोहळ्याचा फटका बसत आहे.

अंबानीच्या विवाहाचा बीकेसीतील कर्मचाऱ्यांना फटका : देश विदेशातील विविध उच्चभ्रू, राजकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ, बॉलीवूडमधील कलाकार व खुद्द लग्नघरातील अंबानींची सुरक्षा यामुळं या परिसराला अक्षरशः छावणीचं स्वरुप आलं. मुंबई पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध मार्गांवर वाहतूक नियमन करण्यासाठी प्रतिबंध लादले आहेत. सार्वजनिक बस सेवा, टॅक्सी, खासगी वाहनांच्या वाहतुकीवर करडी नजर आहे. त्यामुळं या परिसरात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र या सुरक्षाविषयक कार्यवाहीचा जाच होत आहे. कार्यालयात जाताना, येताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे, अंबानीच्या लग्नामध्ये उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रेटींविषयी उत्सुकता असतानाही सर्वसामान्यांना या एकूण घडामोडींचा फटका देखील बसत आहे.

काय म्हणाले कर्मचारी : या परिसरातील कर्मचाऱ्यांची होत असलेली अडचण लक्षात घेऊन विविध कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा विवाह सोहळा समाप्त होईपर्यंत 15 जुलै पर्यंत कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधा (वर्क फ्रॉम होम) दिली आहे. जिओ सेंटर जवळील कार्यालयात काम करणाऱ्या मनोहर दळवी या कर्मचाऱ्यानं या घडामोडींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कामावर हजर राहण्यासाठी आपल्याला रेल्वे स्थानकापासून रिक्षा, बस पकडून यावं लागतं. मात्र, या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्यानं आपल्याला कार्यालयात पोहोचण्यास अडचण येत असल्याचं मत दळवी यांनी व्यक्त केले. अंबानी कुटुंबियांनी कशा पध्दतीनं लग्न सोहळा आयोजित करायचा हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना, या परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू नये, अशी काळजी घेण्याची गरज होती, असं मत शगुफ्ता शेख यांनी व्यक्त केलं. हा लग्न सोहळा अत्यंत वर्दळीच्या व विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं असलेल्या ठिकाणी आयोजित केल्यानं त्याचा सर्वसामान्यांना त्रास झाल्याचं मत शेख यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या पंडितानं घेतली 'इतकी' दक्षिणा - Anant Radhika Wedding
  2. अनंत अंबानीच्या लग्नात नाचून प्रियांका चोप्रा खूश, म्हणाली, "सासरी हे सर्व मिस करते" - Priyanka Chopra

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.