ETV Bharat / state

आता गृहसंकुलांच्या बैठकीतही होतायेत 'राजकीय खलबतं'; काय आहे नेमकी भानगड? - Anand Vihar Sankul Society - ANAND VIHAR SANKUL SOCIETY

Anand Vihar Sankul Society Meeting : गृहसंकुलांच्या बैठकीत देखभाल खर्च, पार्किंग आणि सोसायटीच्या अडचणी समोर येत असतात. मात्र, कळव्यातील एका गृहसंकुलानं चक्क आमदार कोणाला बनवायचं याचा ठराव केलाय. वाचा सविस्तर बातमी...

Anand Vihar Sankul Society
आनंद विहार संकुलन बैठक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 7:34 PM IST

ठाणे Anand Vihar Sankul Society Meeting : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) पडघम वाजू लागलं आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. त्यातच कळवा मुंब्रा या मतदारसंघामध्ये कळवा भागातील आनंद विहार संकुलनाची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत एक ठराव मांडण्यात आलाय.

जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच कळवा मुंब्रा या मतदारसंघामध्ये कळवा भागातील आनंद विहार संकुलन या ठिकाणी सोसायटीची सर्वसाधारण एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला. आनंद विहार संकुलनाच्या परिसरात झालेला कायापालट आणि कामाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्याचं ठरलंय.

प्रतिक्रिया देताना आनंद विहार संकुलनाचे सदस्य (ETV Bharat Reporter)

विधानसभा निवडणुकीमध्ये कौल कोणाला : याच कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जितेंद्र आव्हाड यांना महायुतीकडून कोंडीत पकडण्याचं काम सुरू आहे. तर याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला आपलं नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादी कार्यालय तसेच विविध कामाबाबत माजी नगरसेवकांना अजित पवार गटात सामील करत निधी देखील देण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळं लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये जनता कशाप्रकारे कौल देते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे.

'काम बोलता हैं' असे लागले पोस्टर्स : जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदारसंघात अनेकदा पोस्टर्स वॉर पाहायला मिळालं. 'काम बोलता हैं' असा मजकूर लिहिलेले अनेक पोस्टर्स या मतदारसंघात लागलेले आहेत.

हेही वाचा -

  1. जितेंद्र आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार ? अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल; नेमकं प्रकरण काय? - Jitendra Awhad
  2. मुंब्र्यात ईदच्या जुलूसमध्ये फडकले पॅलेस्टाईनचे झेंडे; जितेंद्र आव्हाड यांची भन्नाट प्रतिक्रिया - Palestine Flag
  3. "शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोलाही...", देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया - Jitendra Awhad

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.