मुंबई Amruta Fadnavis Extortion Case : मागच्या वर्षी बुकी अनिल जयसिंगानी यानं अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्याची तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडं दाखल केली होती. त्या संदर्भातला खटला आधी सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात दाखल झाला होता. जामीन मिळण्यासाठी अनिल जयसिंगानीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या न्यायालयात दाखल होता. संदर्भातील खटल्याच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या न्यायालयानं बुकी अनिल जयसंघानीला आज जामीन मंजूर केला आहे. 31 जानेवारी रोजी न्यायालयानं हे आदेश पत्र जारी केलेलं आहे.
ओळख करून खंडणी मागण्याचा प्रयत्न : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी बुकी अनिल जयसिंगानी याच्या मुलीनं ओळख केली होती. त्यानंतर मुलीला मैत्री करायला लावून वडिलानं मुलीमार्फत अमृता फडणवीस यांना जाळ्यात अडकवण्यासाठी सापळा रचल्याचा दावा करण्यात आला होता. त्याद्वारे खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती. एफ आय आर नोंदवल्यानंतर बाप आणि लेकीला अटक करण्यात आली होती. यावेळी अनिल जयसिंगानीच्या मुलीला काही अटीवर जामीन दिला होता. मात्र अनिल जयसिंगानी याच्यावर अनेक खटले असल्यामुळं तो कोठडीतच होता. मात्र त्यानं जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकल खंडपीठानं त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यामुळं आता त्याचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोण आहे अनिल जयसिंगानी : बुकी असलेला अनिल जयसिंगानी याच्यावर 17 प्रकारचे विविध गुन्हेगारी खटले दाखल होते. त्याच्यावर अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानं त्याच्या मुलीमार्फत अमृता फडणवीस यांच्याकडं दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याच्या मुलीनं व्हाट्सअप चॅटमधून अनेक प्रकारची मागणी केल्याची एफआयआर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेली होती. गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आणि महाराष्ट्राच्या पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये अनिल जयसिंगानीला अटक केलेली होती. अनिल जयसिंगानी याची मुलगी आणि भाऊ निर्मल याला 2023 यावर्षीच कोर्टाकडून जामीन मिळालेला होता. आता उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यामुळं तळोजा तुरुंगातून अनिल जयसिंगानीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे.
हेही वाचा :