ETV Bharat / state

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मुंबईतील 20 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, 233 कोटी रुपये खर्च केले जाणार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 10:35 PM IST

रेल्वे प्रवाशांना आरामदायी, सोयीस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव घेता यावा म्हणून पश्‍चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्‍वरी, मालाड आणि पालघर या 8 उपनगरीय स्थानकांचा यात समावेश असून, यासाठी 233 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनल्समध्ये रेल्वे स्थानकांचा विकास करण्याला महत्त्व दिले आहे.

amrit bharat station scheme
amrit bharat station scheme

मुंबई - भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानकांचे काम केले जाणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्‍चिम रेल्वेच्या सहा विभागांमध्ये पसरलेल्या ६६ रेल्वे स्थानकांची पायाभरणी केली जाणार आहे.

4886 कोटींपेक्षा जास्त खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यामध्ये 46 स्थानके गुजरात राज्यात आहेत, तर 11 महाराष्ट्रात आणि 9
मध्य प्रदेशात आहेत. महाराष्ट्रातील 11 स्थानकांपैकी मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी जोगेश्‍वरी, मालाड आणि पालघर या 8 उपनगरीय स्थानकांची पायाभरणी करण्याकरिता 233 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्यादेखील बारा स्थानकांचा होणार कायापालट- पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या बारा स्थानकांचा या योजनेअंतर्गत कायापालट केला जाणार आहे. या बारा स्थानकांमध्ये सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, इगतपुरी या स्थानकांच्या समावेश आहे. यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाला 260 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या बारा स्थानकांमध्ये सर्वात जास्त निधी हा दिवा रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासासाठी देण्यात आला आहे. तर तब्बल 45 कोटी रुपये दिवा रेल्वे स्थानकाच्या कामासाठी देण्यात आले आहेत.

233 कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास- रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेतील आठ स्थानकांपैकी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणासाठी 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मलाड रेल्वे स्थानकाच्या पुनर्व विकासासाठी 35 रुपये कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लोअर परेल रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 30 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. मरीन लाईन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये देण्यात आला आहे. ग्रँड रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये, चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 23 कोटी रुपये, प्रभादेवीसाठी 21 कोटी आणि पालघर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास आणि पुनर्बांधणीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. असे मिळून एकूण 233 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात पश्चिम रेल्वेतील 8 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील 20 स्थानकांचा पुनर्विकास होणार- यात अधिक माहिती अशी की, मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड स्थानकांवर बारा मीटर रुंद पायी ओव्हर ब्रिजसाठी तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी 85.23 कोटी इतका खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. याचा खर्चदेखील 233 कोटी रुपयांमध्ये समाविष्ट आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरील 12 असे मिळून मुंबईतील एकूण 20 स्थानकांच्या पुनर्विकास होणार आहे. या कामांमध्ये सुधारित टॉयलेट बॉक्स आणि ड्रेनेज सिस्टीम बसवणे, स्ट्रक्चरल दुरुस्ती आणि छतावरील पत्रांची दुरुस्ती करणे, तिकीट बुकिंग ऑफिस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था आणि पार्किंग क्षेत्र तयार करणे या कामांची तरतूद आहे.

हेही वाचा-

  1. कल्याण रेल्वे स्थानकात आढळली स्फोटोक, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू
  2. ठाण्याजवळ नवीन रेल्वे स्थानक होणार, कामाला मिळणार गती; वाचा कधीपर्यंत होणार प्रवाशांसाठी खुलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.