ETV Bharat / state

आमदार कुटुंबियांच्या कारला भीषण अपघात, चिमुकलीसह सहा ठार - Akola Accident - AKOLA ACCIDENT

Akola Accident : अकोला वाशिम रस्त्यावर पातूरजवळ झालेल्या अपघातात 6 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा समावेश आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली .

Akola Accident
Akola Accident (Reporter Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 8:20 PM IST

अकोला Akola Accident : जिल्ह्यातील पातूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात समोरासमोर कारची धडक होऊन सहा जण ठार झाले आहे. मृतामध्ये आमदार सरकानाईक यांच्या नातेवाईकासह एका चिमुकलीचा देखील समावेश आहे. रस्त्याचं काम सुरू असल्यानं एका बाजूनं रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळं अपघात झाल्याचं बोललं जात आहे. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून शुक्रवारी दुपारी ही घटना घडलीय.

अपघातात 6 जणांचा मृत्यू : अकोला ते हैदराबाद चारपाडी रस्त्यावरील पातूर वळणावर चारचाकी (क्र. एमएच 37 बीएल 9552) तसंच वाशिमहून येणारी चारचाकी (क्र. एमएच 37 व्ही 0511) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या रस्त्याचं काम सुरू असल्यानं काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आलीय. दोन्ही चारचाकी समोरासमोर आल्यानं भीषण अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. यापैकी एक गाडी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाची आहे. प्राप्त माहितीनुसार या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये किरण सरनाईक यांचा वाहन चालक अमोल शंकर ठाकरे, पुतण्या रघुवीर अरुण सरनाईक वाशिम, मुलगी शिवानी अजिंक्य आमले आणि नात अस्मिरा अजिंक्य आमले नागपुर यांचा समावेश आहे. हे सर्व सरनाईक यांच्या कारमध्ये प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच आमदार सरनाईक यांच्या घरी शोककळा पसरलीय.

तीन जण गंभीर जखमी : पास्टुल येथील सिद्धार्थ यशवंत इंगळे, सुमेध इंगळे यांचाही घटनास्थळी मृत्यू झाला असल्याचे माहिती मिळतेय. तर, इतर तीन जण गंभीर जखमी असून, त्यांचा अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पियुष देशमुख, सपना देशमुख, श्रेयस सिद्धार्थ इंगळे अशी जखमीची नावं असल्याचं समजतंय. चारपदरी असलेल्या अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळं काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली. त्यामुळंच हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपघाताची घटना कळताच पोलीसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

हे वाचलंत का :

  1. राहुड घाटात एसटी ट्रकचा भीषण अपघात ; अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू - Mumbai Agra highway accident
  2. छत्तीसगडमध्ये भीषण अपघात: मालवाहू वाहन- ट्रकच्या धडकेत आठ जणांचा मृत्यू, 23 जखमी - bemetara Road Accident
  3. उन्नावमध्ये बस-ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू - UNNAO ROAD ACCIDENT

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.