ETV Bharat / state

नातसुनेनं आजी सासूला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, कारण काय? - Amravati crime - AMRAVATI CRIME

Morshi Fire News : नातसुनेनं आजी सासूच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलीय.

Morshi Fire News
नातसुनेनं आजी सासूला जिवंत जाळलं (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 10:05 AM IST

अमरावती Morshi Fire News : नातसुनेनं आपल्या आजी सासूच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात घडल्यानं एकच खळबळ उडालीय. गोदाबाई देवघरे असं मृत आजी सासूचं नाव असून ती 80 वर्षाची होती. या प्रकरणात पोलिसांनी आजीची हत्या करणाऱ्या दिपाली पाचघरे या सुनेला अटक केलीय.

अशी आहे घटना : मोर्शी शहरात अमरावती मार्गावर असणाऱ्या डॉ पंजाबराव देशमुख कॉलनी इथं प्रतीक पांडुरंग पाचघरे यांचं घर आहे. या घरात प्रतीकची पत्नी दिपाली, त्याची पाच वर्षाची मुलगी आई आजी असं कुटुंब होतं. शनिवारी सायंकाळी प्रतीक घराबाहेर गेला होता. त्याची पत्नी दिपालीनं आजी गोदाबाई आपल्या खोलीत झोपली असताना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं.

स्वामी समर्थ केंद्रातील महिला आल्या धावून : पाचघरे यांच्या घरासमोरच श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे. सायंकाळी या ठिकाणी पारायणासाठी महिला जमल्या असताना त्यांना समोरच्या घरात आग लागल्याचं दिसली. त्यांनी त्या घराकडे धाव घेतली. घराच्या गच्चीवर असणारी प्रतिकची आईदेखील खाली धावत आली. घरात धावत आलेल्या व्यक्तींनी गोदाबाई देवघरे यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत 100 टक्के भाजल्यामुळं गोदाबाईंचा मृत्यू झाला होता.

नातसून पोहोचली पोलीस ठाण्यात : आजी सासूला जाळून ठार मारल्यावर दिपाली ही आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला घेऊन थेट मोर्शी पोलीस ठाण्यात पोहोचली. झालेल्या प्रकाराची तिनं पोलिसांना माहिती दिली. या गंभीर घटनेची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे, ठाणेदार श्रीराम लांबडे पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी दिपाली पाचघरे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक केलीय. दिपाली मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. तिच्यावर अमरावती येथील एका डॉक्टरांकडं उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. बांगलादेशच्या राजधानीत सात मजली इमारतीत अग्नितांडव; 44 जणांचा होरपळून मृत्यू
  2. मध्य प्रदेशच्या राजधानीत अग्नितांडव! मंत्रालयाला भीषण आग, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.