ETV Bharat / state

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; मेळघाटात दारुड्या मुलानं केली आईची हत्या - Son Killed Mother In Melghat

Son Killed Mother : आईने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं, एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडलीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी मुलास धारणी पोलिसांनी अटक केलीय.

Son Killed Mother
मुलाने केली आईची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 9:25 PM IST

अमरावती Son Killed Mother : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना, मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्याच्या (Dharani Police Station) हद्दीत घडलीय. पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केलीय.

अशी आहे घटना : गंगाबाई मोतीराम जांभेकर (60) असं भोकरबर्डी येथील मृत महिलेचं नाव आहे. पवनकिशोर मोतीराम जांभेकर (23) असं आरोपी मुलांच नाव आहे. गंगाबाई जांभेकर यांना शासनाच्या एका योजने अंतर्गत नुकतेच काही पैसे मिळाले होते. याबाबत कळल्यावर पवनकिशोर याने शुक्रवारी रात्री आई गंगाबाईला दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र गंगाबाईने मुलास पैसे देण्यास नकार दिल्यामुळं पवनकिशोरने आईसोबत वाद घातला. यानंतर पवनकिशोरने चक्क जन्मदात्या आईवर काठीनं हल्ला चढवला. काठी हल्ल्यात जखमी झालेल्या गंगाबाई या खाली कोसळल्या आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

रात्रभर घरातच पडून होता मृतदेह : गंगाबाई जांभेकर आणि त्यांचा मुलगा पवनकिशोर जांभेकर यांचे नेहमीच भांडण होत होते. त्यामुळं शुक्रवारी रात्री त्यांच्या घरात सुरू असलेल्या भांडणाकडं शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. मुलाने आईची हत्या केल्यावर तिचा मृतदेह रात्रभर घरातच पडून होता. शनिवारी सकाळी गावकऱ्यांना ही घटना कळताच त्यांनी धारणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणात पवनकिशोर जांभेकर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिलीय.

नाष्टा बनविला नाही म्हणून केली हत्या : या आधीही अशीच एक घटना घडली होती. आईनं सकाळी नाष्टा बनविला नाही म्हणून मुलानं आईची हत्या केली होती. ही धक्कादायक घटना कर्नाटक राज्यातील बंगळुरु येथे 2 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली होती. मृत महिलेचं नाव नेत्रावती (40 वर्षे) असून मुलगा 17 वर्षांचा आहे. हत्येनंतर त्यानं स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं.

हेही वाचा -

  1. Son Killed Mother: धक्कादायक! दारूला पैसे दिले नाहीत म्हणून पोटच्या लेकाने घेतला आईचा जीव
  2. नाष्टा केला नसल्यानं मुलानं केली आईची हत्या, बंगळुरुतील धक्कादायक घटना
  3. Son Killed Mother : बेरोजगार मुलानं केला आईचा खून; 'हे' आहे धक्कादायक कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.