ETV Bharat / state

फेस मॅपींगबाबत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली चिंता; एआयच्या तंत्रज्ञानाबाबत सांगितली 'ही' गोष्ट - फेस मॅपींग

Amitabh Bachchan On AI : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी फेस मॅपींग तंत्रज्ञानाविषयी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुंबईतील एका स्टुडुओनं दाखवलेल्या हॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचा किस्सा सांगितला.

Amitabh Bachchan On AI
सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 9:29 AM IST

पुणे Amitabh Bachchan On AI : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी फेस मॅपींगबद्दल चिंता व्यक्त केली. पुणे इथल्या सिम्बायोसिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांना ते शनिवारी संबोधित करत होते. यावेळी त्यांनी चिप्सच नाही, तर चित्रपटाच्या एडिटींगमध्येही प्रचंड बदल झाले आहेत. चित्रपट एडीट करणाचं तंत्रज्ञान प्रचंड बदललं आहे. एआय या तंत्रज्ञानानं तर फेस मॅपींग केलं जाते. ही चिंतेची बाब आहे, त्यामुळं भविष्यात कोणाचंही फेस मॅप करून ते कधीही वापरलं जाईल, अशी चिंता बीग बी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले अमिताभ बच्चन : चित्रपट उद्योगाच्या एडिटींगमध्ये प्रचंड बदल होत आहेत. याबाबत बोलताना बीग बी म्हणाले की, आता फक्त चिप्सचं नाही, तर चित्रपटाच्या एडिटींगमध्येही प्रचंड बदल झाले आहेत. नुकत्यात आलेल्या एआय तंत्रज्ञानात फेस मॅपींग करण्यात येते. आपलं संपूर्ण शरीर फेस मॅप केलं जाते. हे फेस मॅप केलेलं कधीही वापरलं जाईल, याची भीती आहे. त्यामुळं ही चिंतेची बाब आहे, अशी भीती अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली.

टॉम हँक्सची दाखवण्यात आली क्लिप : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी यावेळी मुंबईतील एका स्टुडिओनं दाखवलेल्या क्लिपचा किस्सा ऐकवला. याबाबत ते म्हणाले की, "नुकतच मला मुंबईतील एका स्टुडिओत बोलवण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते टॉम हँक्स यांची एक क्लिप मला दाखवली. यावेळी त्यांनी टॉम हँक्सचं फेस मॅपींग दाखवलं. त्यानंतर या स्टुडिओनं मला तीच क्लिप 20 वर्षीय टॉम हँक्ससोबत दाखवली. ही दोन्ही दृष्ये पाहुन थक्क झालो," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सिम्बायोसिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बीग बी' : पुण्यातील सिम्बायोसिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना शनिवारी पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी सिम्बायोसिसच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बीग बी अमिताभ बच्चन यांनी चित्रपट उद्योगातील अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती दिली.

हेही वाचा :

  1. अमिताभ बच्चन यांनी घर बांधण्यासाठी अयोध्येत खरेदी केली जमीन; किंमत जाणून बसेल धक्का
  2. जयपूर पिंक पँथर्सला चिअर करण्यासाठी पोहचले बच्चन कुटुंब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.