मुंबई- Amitabh Bachchan News : महानायक अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेता अमिताभ यांना आज पहाटे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त करत असतानाच बिग बींनी दुपारी एक्स मीडियात पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये नेहमीच कृतज्ञ असल्याचं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांनी १४ मार्चला 'जलसा' बंगल्यातून बाहेर येत चाहत्यांची भेट घेतली होती. त्याबाबत त्यांनी एक्स मीडियावर पोस्टदेखील केली होती. दुसऱ्याच दिवशी अमिताभ बच्चन यांची प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनी "आपल्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही. आलेल्या बातम्या या फेक आहेत," असं एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं.
“अँजिओप्लास्टी त्यांच्या पायातल्या गुठळ्यावर करण्यात आली आहे, हृदयावर नाही,” असे वृत्तपत्रातील माहितीच्या आधारे कळत आहे. अमिताभ बच्चन आपल्या वयैक्तिक आयुष्यात घडणाऱ्या लहान सहान गोष्टींचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्यावर झालेल्या अँजिओप्लास्टीमुळे चाहते चिंतातुर झाले आहेत. कोकिलाबेन रुग्णालयातून वैद्यकिय पत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर बच्चन यांच्या प्रकृती स्वस्थ्यासाठी प्रार्थना सुरू केल्या आहेत. मात्र "आपल्या आरोग्याबाबत आलेल्या बातम्या या फेक आहेत," असं अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं आहे.
अमिताभ बच्चन हे नुकतेच 'इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग'मध्ये दिसले होते. त्यांनी 'मुंबई माझी' टीमला प्रोत्साहित केले. ही बिग बींची टीम असून ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. अमिताभ बच्चन यांचा 'कल्की एडी २८९८' हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये दीपिका पदुकोन, कमल हसन आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक नाग अश्विन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
हेही वाचा -
- ग्लोबल गायक एड शीरनने 'किंग खान' आणि गौरी खानसाठी केला परफॉर्मन्स, 'मन्नत'मधील व्हिडिओ व्हायरल
- "सर्वांचा खूप अभिमान वाटला", म्हणत कियारा अडवाणीनं केलं पती सिद्धार्थच्या 'योद्ध्या'चं कौतुक
- Bhool Bhulaiya 3 Shoot: पाय फ्रॅक्चर असतानाही अनीस बज्मी करतोय 'भूल भुलैया 3' चे शुटिंग, कार्तिक आर्यनचा प्रेरणादायी अनुभव