ETV Bharat / state

कसाबला तुरुंगात खरंच बिर्याणी देण्यात आली होती का? अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा मुंबईवरील दहशतवादी हल्ला चर्चेत! विरोधक म्हणाले.... - Ajamal Kasab Biryani Controversy

Amit Shah on Ajmal Kasab Biryani : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचा विषय चर्चेत आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणताना कसाबच्या बिर्याणीचा संदर्भ दिला आहे. दहशतवादी कसाबला खरचं बिर्याणी देण्यात आली होती का? अमित शाह यांनी केलेल्या विधानाबाबत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचं काय म्हणणं आहे?

Amit Shah on Ajamal Kasab Biryani
अमित शाह, उद्धव ठाकरे (Source- ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 12:39 PM IST

Updated : Jul 22, 2024, 6:28 PM IST

पुणे Amit Shah on Ajmal Kasab Biryani - लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून फेक नॅरिटव्ह केल्याचा भाजपाकडून सातत्यानं आरोप करण्यात येतो. हे फेक नॅरेटिव्ह दूर करण्याकरिता आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता पुण्यात दोन दिवसांचं अधिवेशन घेतलं. या अधिवेशनाचा रविवारी समारोप करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र, या टीकेत त्यांनी कसाबला बिर्याणी देण्याचा उल्लेख केल्यानं हा विषय पुन्हा चर्चेत आला.

भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह म्हणाले, "उद्धव ठाकरे हे कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत सोबत गेले. याकुब मेमनची सुटका करण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. या क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत."

मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला यंदा 26 नोव्हेंबरला 16 वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, अद्यापही यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतात.

  • मुंबईवरील हल्ला कसा घडला होता?

पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गानं घुसून 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला केला. या हल्ल्यात 166 नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. रात्री साडेबारा वाजता मुंबई नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करत दहतवाद्यांची कार अडविली. यावेळी दहशतवाद्यांची पोलिसांच्या सूचनेनुसार गाडी न थांबविता थेट गोळीबार केला. यावेळी पोलीस कर्मचारी भास्कर कदम यांनी सर्व्हिस रिव्हॉलवरमधून गोळीबार करत दहशतवादी अबू इस्माईलला जखमी केलं. कारमध्ये बसलेल्या कसाबला पकडण्यासाठी जात असताना त्याने एके-47 मधून गोळीबार केला. यावेळी तुकाराम ओंबळे यांनी स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलत कसाबला अटक केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात विदेशी नागरिकांसह 166 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबचा सहभाग आढळला. कसाब वगळता सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं ठार केलं. कसाबला फाशी देण्यात न आल्यानं जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. अखेर चार वर्षांनी अजमल अमीर कसाबला 21 नोव्हेंबर 2012 ला फाशी देण्यात आली.

Ajamal Kasab case
दहशतवादी अजमल कसाबची कशी सुनावणी झाली? (Source- ETV Bharat)
  • तत्कालीन माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी पुस्तकात काय म्हटलं?

माजी आयएपीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी 'मॅडम कमीशनर' या पुस्तकात कसाबबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात दहशतवादी कसाबला पुणे येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. त्याकाळात नेमकं काय घडलं, याबाबत मीरा बोरवणकर यांनी 'मॅडम कमीशनर' पुस्तकात माहिती दिली. कसाबला बिर्याणी देण्यात आल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. त्यावर पुस्तकात म्हटले की, "तुरुंगात आणल्यानंतर कसाब प्रचंड रागात होता. त्याच्याशी बोलल्यानंतर त्यानं अनेकदा मौन बाळगलं. तर कधी हसून गप्प राहणं पसंत केलं. डॉक्टरांकडून त्याच्या आरोग्याची आणि डायटची खास काळजी घेण्यात येत होती. मात्र, त्याला कधीही बिर्याणीसारखी खास डिश देण्यात आली नाही. कसाब व्यायाम करून स्वत:ला बिझी ठेवायचा." कसाबला फाशी देण्याकरिता कशी तयारी करण्यात आली, यावरदेखील पुस्तकात माहिती देण्यात आली. त्यांनी म्हटलं, "तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सर्किट हाऊसमध्ये बोलावून फाशीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली फाशी देण्याबाबत संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. तीस वर्षानंतर राज्यात पहिल्यांदाच फाशी देण्यात येत असल्यानं सतर्कता बाळगण्यात आली होती."

भारतीय जनता पक्ष आता निवडणुकीतील पराभवाला घाबरला आहे. महाराष्ट्रातील जनतेनं भाजपाला नाकारले आहे. त्यामुळे भाजपा आता महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यावर फेक नॅरेटिव्हचा खोटा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते आता कसाबला न दिलेल्या बिर्याणीचा उल्लेख करुन फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा स्वत: प्रयत्न करत आहेत. मात्र राज्यातील जनता शहाणी असल्यानं त्यांची दिशाभूल करणे भाजपाला शक्य होणार नाही - क्लाईड क्रास्ट्रो, राष्ट्रीय प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार

  • कसाबनं बिर्याणी मागितल्याचा निकम यांनी का केला दावा - कसाबला फाशी दिल्यानंतर काही वर्षांनी विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केला. "कसाबनं कधी बिर्याणी मागितली नव्हती. मात्र, भावनात्मक लाट थांबविण्यासाठी तसा दावा केला होता," असं निकम यांनी म्हटलं. हे विधान त्यांनी 2015 मध्ये जयपूरमधील दहशतवाद विरोधी आंतरराष्ट्रीय परिषेदत केलं. उज्जवल निकम त्यावेळी म्हणाले की, "कसाबनं कधी बिर्याणी मागितली नव्हती. तसंच सरकारकडून कधीही त्याला बिर्याणी देण्यात आली नाही. दहशतवादी कसाबबाबत भावनिक सहानुभूती थांबविण्यासाठी तसं वक्तव्य केलं होतं." यावेळी त्यांनी सुनावणीच्या खटल्यातील माहिती दिली. ते म्हणाले, "रक्षाबंधन दिवशी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याला बहिणीची आठवण येत असल्याचं म्हटलं. तसंच तो दहशतवादी असल्याबाबत संशय व्यक्त केला. त्यामुळे कसाबकडून मटन बिर्याणीची मागणी होत असल्याचं वक्तव्य केलं होतं." दुसरीकडं एका वाहिनीवरील मुलाखतीत निकम यांनी पुन्हा एकदा माहिती दिली. त्यांनी म्हटलं, " कसाबनं मटण बिर्याणीची मागणी केली का? असे मी म्हटलं होतं. त्यावरून अक्कलेचे तारे तोडण्यात आले होते. विरोधी पक्षांनीही बिर्याणी देण्याच्या विधानावरून टीका केली होती."

भाजपाला उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोन मोठे नेते मोठं आव्हान ठरत असल्याचे दिसत आहे, त्यामुळं त्यांच्याबद्दल चुकीचा व खोटा दृष्टिकोन पसरवण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न आहे. फेक नॅरेटीव्हचा वापर त्यांच्याकडूनच केला जात आहे. जनतेमध्ये या नेत्यांविषयी कलुषित वातावरण निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न यातून स्पष्ट दिसून येत आहे. खोटे व चुकीचे दृष्टिकोन पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोन्ही गृहमंत्र्यांनी एकाच वेळी इतक्या वाईट पद्धतीने वक्तव्य करणे ही गंभीर बाब आहे. फडणवीसांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. महाराष्ट्रात विषारी विचारांची पेरणी केली जात आहे. त्यामुळे जनतेने सजग होऊन कोण कुठल्या पक्षाचा पाठीराखा आहे याला दुय्यम स्थान देऊन आता सतर्क राहण्याची गरज आहे. - असीम सरोदे, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते

विरोधकांची बिर्याणीच्या वक्तव्यावरून टीका - काँग्रेसनं अमित शाह यांच्या विधानावरून भाजपावर टीका केली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटलं, "भाजपाचा खोटारडेपणा याआधीच उज्ज्वल निकम यांनी उघडा पाडला होता. पण भाजपाची मुजोरी सुरुच आहे . "खोटं बोल पण रेटून बोल" ही प्रवृत्ती गुजरातमध्ये चालत असेल. पण महाराष्ट्र कदापि हे सहन करणार नाही."

जेव्हा 2014 पूर्वी भाजपाचं सरकार नव्हतं तेव्हा भाजपातील नेते कसाबला तुरुंगात असताना बिर्याणी दिली होती असे आरोप करत होते. मात्र, आता काही दिवसांपूर्वी वकील उज्वल निकम यांनी कसाबला बिर्याणी दिली नव्हती, असा दावा केल्यानंतर पुण्यात गृहमंत्री अमित शाह यांनीही कसाबला बिर्याणी दिली नव्हती असं म्हटलं आहे. त्यामुळे अमित शाह किंवा भाजपातील नेते हे सोयीनुसार बोलत आहेत आणि सोयीचे राजकारण करत आहेत. भाजपा सत्तेत यायच्या आधी कसाब हा आरोपी आहे आणि त्याला तुरुंगात बिर्याणी दिली, असा आरोप तत्कालीन सरकारवर करत होते. तेच भाजपा नेते आता सतेत असताना कसाबला बिर्याणी दिली नव्हती, असं म्हणत आहेत. यांची ही दुटप्पी भूमिका आहे आणि हे फेक नरेटिव निर्माण करत आहेत. - हेमलता पाटील, काँग्रेस प्रवक्त्या

शिक्षा व्हायला चार वर्षाचा कालावधी कोणी घेतला- भाजपा नेते तथा आमदार अतुल भातखळकर म्हणाले, "अजमल कसाबला बिर्याणी दिली, अथवा नाही दिली हा वास्तविक मुद्दाच नाही. अजमल कसाबसारख्या देशद्रोह्याला रंगेहाथ पकडण्यात आले होतं. त्याला फाशी द्यायला एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी कोणी लावला? अफजल गुरुसारख्या दहशतवाद्यानं संसदेवर हल्ला केला. त्याला शिक्षा व्हायला चार वर्षाचा कालावधी कोणी घेतला? तर अल्पसंख्यांक मतांकडे पाहून काँग्रेसनं केलेलं हे कृत्य आहे." 26/11 दहशतवादी हल्ल्याचं लोकल कनेक्शन अद्याप का नाही पकडलं गेलं? असा सवालही आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला.

काँग्रेसकडून सोयीनुसार राजकारण- "अल्पसंख्यांक मतांसाठी सोयीनुसार राजकारण करायचं, ही काँग्रेसची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. राष्ट्रीय सुरक्षेची तडजोड करून अशा पद्धतीचे कटकारस्थान काँग्रेस करत आली आहे. हा देशासाठी मोठा धोका आहे. दहशतवादी अजमल कसाबच्या बिर्याणीवरून राजकारण करण्यापेक्षा अल्पसंख्यांक मतांचं राजकारण काँग्रेसनं बंद करावं," असंही अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

  • लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात महायुती सरकारला फटका बसला. अल्पसंख्यांकांची मते शिवसेना ठाकरे पक्षाला मिळाल्याचा आरोप यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांनी केला. यंदा राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावरून राज्यात व्होट बँकेचे राजकारण सुरू असल्याचं राजकीय विश्लेषकांच मत आहे.

हेही वाचा-

  1. "शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, त्यांचं सरकार येताच आरक्षण..."; पुण्यातून अमित शाहांचं शरसंधान - Amit Shah on Sharad Pawar
  2. 26/11 दहशतवादी हल्ला : कसाबला कसं जिवंत पकडलं ? निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार

Last Updated : Jul 22, 2024, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.