ETV Bharat / state

पोलीस भरतीत घोटाळा टाळण्यासाठी अमरावती पोलिसांकडून 'आरएफआयडी' तंत्राचा वापर - Police Recruitment 2024 - POLICE RECRUITMENT 2024

Police Recruitment 2024 : राज्यात सर्वत्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. या पोलिस भरतीसाठी लाखो उमेदवार तयारी करत आहेत. भरती प्रक्रिया सोपी आणि सुकर व्हावी यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीनं 'आरएफआयडी' तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

Police Recruitment 2024
Police Recruitment 2024 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 2:11 PM IST

अमरावती पोलिसांकडून 'आरएफआयडी' तंत्राचा वापर (ETV Bharat Reporter)

अमरावती Amravati Police Recruitment 2024 : राज्यभर आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही भरती प्रक्रिया सोपी आणि सुकर व्हावी यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीनं 'आरएफआयडी' म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्रणालीमुळं भरती प्रक्रियेला गती येईल तसेच पारदर्शकता योग्यपणे बाळगता येईल, असा दुहेरी उद्देश असल्याचं अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हटलं आहे. अमरावती ग्रामीण मध्ये 207 जागांसाठी 27 हजार 981 जणांनी अर्ज केले आहेत. जोग स्टेडियम या ठिकाणी या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे.

अशी आहे आरएफआयडी प्रणाली : रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानात रेडिओ लहरींचा वापर टॅग केलेल्या ऑब्जेक्टला ओळखण्यासाठी केला जातो. पोलीस भरती प्रक्रियेत आरएफआयडी अँक्लेट उमेदवारांच्या पायाला बांधल्या जातो. उमेदवार मैदानावर उतरल्यापासून मैदानाबाहेर निघेपर्यंत ते त्याच्या पायाला बांधलेलं राहणार आहे. यामध्ये लागलेले सेंसर हे उमेदवार धावायला लागल्यापासून ते त्यानं आपलं धावणं थांबवण्यापर्यंत त्याचा वेग आणि वेळ आपोआप दर्शवतो. शंभर किंवा सोळाशे मीटर धावल्यावर उमेदवारानं निश्चित केलेलं अंतर पार करताच ही प्रणाली आपोआप थांबते. या उपकरणामधील संपूर्ण डाटा संगणकामध्ये सेव्ह राहत असून संपूर्ण भरती प्रक्रिया आटोपल्यावर प्रत्येक उमेदवाराचा योग्य निकाल स्पष्ट होतो, असं देखील पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केलं.

वेळेची बचत होते : या प्रणालीमुळं उमेदवारांचा वेळ वाचत आहे, तसंच आमच्या कर्मचाऱ्यांवरील भार देखील कमी होत आहे. सध्याचं वातावरण हे कडक उन्हाचं आणि पावसाचं देखील आहे. अशा वातावरणामुळं कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उमेदवारांची चाचणी घेणं हे आमचं उद्दिष्ट आहे. या प्रणालीमुळं आमचं हे उद्दिष्ट नक्कीच वेळेत पूर्ण होणार, असा विश्वास देखील पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी व्यक्त केला.

ही प्रणाली अगदी सुरक्षित : "आरएफआयडी'प्रणाली ही अगदी सुरक्षित आहे. यामध्ये उमेदवारानं दिलेल्या चाचणीचा रेकॉर्ड अगदी सेफ राहतो. यामध्ये कोणीही छेडछाड करू शकत नाही. या प्रणालीमुळं भरती प्रक्रिये संदर्भात कोणत्याही उमेदवाराची कसलीच तक्रार नसेल," असं देखील पोलीस अधीक्षक म्हणाले.

हेही वाचा

  1. ऑन युअर मार्क...अमरावतीत पहाटेपासून उमेदवारांची मैदानावर गर्दी, पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात - Police Bharti News
  2. Police Recruitment 2022 : राज्यभरात पोलीस भरतीसाठी शारिरीक चाचण्यांना सुरूवात; अशी असेल प्रक्रिया
  3. छगन भुजबळ आणि शिवसेनेत कुठलाही राजकीय संवाद नाही - संजय राऊत - Chhagan Bhujbal and Shiv Sena

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.