ETV Bharat / state

दोषींवर कारवाई होणारच, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही- अजित पवार - Ajit Pawar Malvan Visit

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 5:50 PM IST

Ajit Pawar Visit At Rajkot Fort : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (30 ऑगस्ट) राजकोट किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar visit at Rajkot Fort Malvan reaction on thackeray rane clashes
अजित पवार यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केली (ETV Bharat Reporter)

मुंबई Ajit Pawar Visit At Rajkot Fort : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच शुक्रवारी (30 ऑगस्ट) सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जात पाहणी केली.

काय म्हणाले अजित पवार? : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी करून अधिकारी वर्गाकडून माहिती जाणून घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की,"मालवणमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेनंतर सगळ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार म्हणून आम्ही जनतेला सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारणार आहोत. राज्य सरकारनं यासंदर्भात निर्णय घेतलाय." तसंच सदर घटनेत कोणीही दोषी असलं तरी त्याच्यावर कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठिशी घातलं जाणार नसल्याचंही अजित पवार म्हणालेत.

ठाकरे, राणे वादावर प्रतिक्रिया : राजकोट किल्ल्यावर दोन दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि नारायण राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला होता. यावर प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले की, “ज्याचं त्याला कळायला हवं. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे? कसं राजकारण झालं पाहिजे? या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्यात. त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षानं तारतम्य बाळगलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी उत्साहाच्याभरात येऊन काहीही करू नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या संस्कृतीनुसारच आपण वागलं पाहिजे”, असं ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर माफी; म्हणाले... - PM Narendra Modi Apology
  2. शिवाजी महाराज पुतळा प्रकरण : स्ट्रक्चरल डिझायनर चेतन पाटीलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Police Detain Chetan Patil
  3. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी गठीत केली संयुक्त तांत्रिक समिती, नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश - Chhtrapati Shivaji Maharaj Statue
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.