मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येतेय. मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेनंतर आता मंत्रिपदाच्या विभाजनावरून वाद सुरू झालाय. दरम्यान, आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह शरद पवारांची भेट घेतलीय, त्या भेटीवर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार, प्रफुल्ल पटेल किंवा पवार साहेबांना संकटकाळात सोडून गेलेले अनेक लोक असतील. पवार साहेब हे महान व्यक्तिमत्त्व आहे. या महाराष्ट्राचा आधारवड आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय निष्ठावंत असतील किंवा अन्य असतील. पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही. पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे. जे त्यांना सोडून केले, त्यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीकाटिपण्णी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय. संजय राऊत दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवारांनी भेटीचं कारण सांगितलं : खरे तर आज शरद पवार यांचा 84 वा वाढदिवस आहे. काकांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतल्याचे अजित पवार म्हणालेत. त्यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी भेटीनंतर सांगितले. मात्र, दोन्ही नेत्यांमधील ही भेट बराच काळ चालली.
आदरणीय शरद पवार साहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या!
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 12, 2024
ईश्वर त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य देवो! pic.twitter.com/Gjlev9g4JL
काल रात्री शाह अन् नड्डा यांचीही बैठक झाली : अजित पवार यांनी काल रात्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांचीही भेट घेतली होती. महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊनही अद्याप खात्यांचं वाटप झालेले नाही. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुती या तिन्ही पक्षांचे याकडे लक्ष लागलंय. खात्यांच्या वाटपाबाबत अजित पवार यांनी शाह आणि नड्डा यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच खाते वाटपाची घोषणा होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गृहमंत्रालय मिळणार नसल्याने भाजपा हे खाते स्वत:कडे ठेवणार असल्याचं सांगितलं जातंय. महाराष्ट्राच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चमकदार कामगिरी केली होती. महाराष्ट्रात एकूण 288 जागांवर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 59 जागांवर निवडणूक लढवली अन् 41 जागा जिंकल्यात. त्याचवेळी या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला चांगलाच फटका बसला आणि त्यांना केवळ 10 जागा जिंकता आल्यात.
हेही वाचा :