पुणे Ajit Pawar Vidhan Sabha Election : पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष दीपक मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा पवारांनी केली.
विरोधी पक्षात राहून विकास अशक्य - अजित पवार : अजित पवार म्हणाले की, आज पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते; पण ग्रामीण भागातील मेळावा होऊ शकला नाही. आज जे सर्व गुरू आहे, त्या गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जात आहे; पण अफवांवर विश्वास ठेवू नये. आज जो काही निर्णय घेतला आहे तो विकासासाठी घेतला आहे. विरोधी पक्षात राहून आंदोलन करून विकास होत नाही. तसेच प्रश्न सुटत नाही. आज पक्षातून काहीजण गेले. जे गेले आहे ते स्वतंत्र आहेत. आपल्याला पुणे शहरात जोमानं काम करावं लागणार आहे. वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि इथपर्यंत पोहचलो आहे. एक असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, विधानसभा निवडणुका या ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्याला होणार आहे. तसेच पुण्यात राज्यातील सर्वांत मोठं एक दिवसीय शिबीर घ्यायचं आहे. त्याच बालेवाडी येथे बुकिंग करण्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
नेरीटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न : अजित पवार पुढे म्हणाले की, २००४ पासून मी पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. मी आरोप-प्रत्यारोपला उत्तर देत नाही. काल झालेल्या बैठकीत मावळात पैसे गेले असं बोललं जात होतं. आधी बारामती शिरूरला निधी दिला त्यावर कोणी बोलत नाही. सगळ्या आमदार खासदार याना मी बोलू दिलं आहे. अकारण नसताना नेरीटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विकासकामांबाबत पवारांचं पुणेकरांना आवाहन : अजित पवार पुढे म्हणाले की, योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या. काम कसं करून घ्यायचं मी बघतो. तसेच केंद्रात एनडीएचं सरकार आहे. आम्ही काही चर्चा मोदी- शाह यांच्याशी केली आहे. केंद्राशी काही योजनांबाबत चर्चा झाली आहे. योजना करताना करोडो रुपये लागतात. आज शहरात रिंग रोड, मेट्रो काम अजून करायची आहेत. पुणेकरांनो, थोडा त्रास होत आहे. काही काम सुरू आहेत. त्याच्या पण कामाला गती देत आहे. आपल्याला वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. पण थोडा दिवस कळ काढा. मी कसं करतो ते बघा.
हेही वाचा:
- "शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, त्यांचं सरकार येताच आरक्षण,..."; पुण्यातून अमित शाहांचं शरसंधान - Amit Shah on Sharad Pawar
- "शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? वाजपेयी, मोदींमुळं आरक्षण..."- देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis
- "... तर विचार करू", विधानसभा निवडणूक उमेदवारीवरून काय म्हणाले चंद्रहार पाटील? - Chandrahar Patil