ETV Bharat / state

अमरावती विमानतळावरून ऑगस्टमध्ये झेपावणार विमान - नवनीत राणा - बेलोरा विमानतळ

Navneet Rana News : अमरावती विमानतळावरून ऑगस्टमध्ये विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. त्यांनी आज विमानतळाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

MP Navneet Rana
नवनीत राणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 10:49 PM IST

नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

अमरावती Navneet Rana News : बेलोरा विमानतळावरून येत्या ऑगस्ट महिन्यात विमानसेवा सुरू होणार असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीच्या रुंदीकरणाचं काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. अमरावतीची जनता तेरा वर्षांपासून विमान उड्डाणांच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळं खासदार नवनीत राणा यांनी आज बेलोरा विमानतळाची पाहणी केली. जून-जुलै महिन्यात विमानतळाच्या काम पूर्ण होणार आहे. ऑगस्टमध्ये विमान हवेत झेपावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राजकारण्यानी केलेले दावे ठरले फोल : अमरावती विमानतळाच्या विस्तारित कामाचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 19 जुलै 2019 रोजी करण्यात आलं होतं. भूमिपूजन समारंभात अमरावती विमानतळ ऑगस्ट 2020 मध्ये सुरू होईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात विमानतळाच्या कामाला दिरंगाई झाल्याचं दिसून येत आहे. याबाबत 27 जानेवारी 2021 रोजी खासदार नवनीत राणा यांनी विमानतळाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी 2022 मध्ये विमानतळ सुरू होणार असल्याचा दावा केला होता.

सर्व दावे आजवर ठरले फोल- खासदार अनिल बोंडे यांनी 28 ऑक्टोबर 2022 रोजी विमानतळाची पाहणी करत अमरावतीतून थेट विमान उड्डाण होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र सर्व राजकारण्यांनी केलेले दावे फोल ठरले आहेत. आज खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा अमरावती विमानतळ उड्डाण होणार असल्याचा दावा केला आहे. तसंच त्यांनी विमानतळ पाहणीत टर्मिनस, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचं काम जून-जुलैपर्यंत पूर्ण होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतरच अमरावतीहून विमानसेवा सुरू होईल, असं खासदार राणा यांनी स्पष्ट केलं.

उच्च न्यायालयानं बजावली होती नोटीस : सलग तेरा वर्षांपासून अमरावती विमानतळाचा कुठलाही विकास होत नसल्यामुळं जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी 2022 मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकाऱ्यासह संचालकांना नोटीसदेखील बजावली होती. उच्च न्यायालयानं नोटीस बजावल्यानंतर विमानतळाच्या कामाला गती आली होती.

कोरोना काळाव्यतिरिक्त 40 दिवस काम बंद : कोरोना काळात अमरावती विमानतळाचं विकास काम बंद होतं. याशिवाय अमरावती विमानतळावर अति महत्त्वाच्या व्यक्तींना घेऊन येणाऱ्या विमानांमुळं विमानतळावरील विकास काम बंद ठेवावी लागली होती. गेल्या दीड वर्षात एकूण 40 अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनामुळं अमरावती विमानतळावरील काम बंद होते, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांना दिली.

विमानतळाचा लुक राहणार आकर्षक : बंगळुरूत देशातील सर्वात सुंदर विमानतळ आहे. अमरावती शहरात विकसित करण्यात येणारे विमानतळ केवळ व्यावसायिक कारणांसाठी नसून या विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करणारं असेल. विमानतळावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज, श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी मंदिरांचे देखावे असणार आहेत. तसंच आशियातील सर्वात मोठा स्काय वॉक मेळघाटच्या चिखलदरा जंगलात होणार आहे. येथील बांबू उत्पादनाची माहिती बाहेरून येणाऱ्यांना प्रवाशांना विमानतळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती खासदार राणा यांनी दिली.

धावपट्टीवर खासदार राणांची व्हील चेअर : खासदार नवनीत राणा या घरात पडल्यानं त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. यामुळं त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच विमानतळाची पाहाणी केली. अमरावती विमानतळाचं काम पूर्ण झालं असतं तर या विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळसह अमरावतीत आले असते, असंदेखील खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सांगितलं.

हे वाचा -

  1. मुंडे, महाजन, मुनगंटीवार लढणार नाहीत लोकसभा निवडणूक, 'हे' आहे मुख्य कारण
  2. काँग्रेस असती तर २१ हजार कोटीपैकी १८ हजार कोटी लुटले असते-पंतप्रधान नरेंद्र मोदी
  3. नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर, हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी तर मंडपासाठी १२ कोटी खर्च केल्याचा पटोलेंचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.